fbpx

सामान्यांचा कर्जाचा हप्ता वाढणार; RBIच्या रेपो रेटमध्ये वाढ

मुंबई : रिझर्व्ह बँकेने आज पुन्हा एकदा रेपो रेटमध्ये 0.50 टक्क्यांनी वाढ करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता रेपो रेट 5.40 टक्के इतका झाला आहे. आरबीआयने रेपो रेटमध्ये वाढ केल्याने याचा थेट फटका सामान्य कर्जदारांना बसणार आहे. सर्व प्रकारची कर्जे महागणार असून सामान्यांचा कर्जाचा हप्ता (EMI) देखील वाढणार आहे.

आज रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीनंतर रेपो दरात वाढ केल्याची माहिती दिली. गुरूवारीच उच्चांकी पातळीवर पोहचलेल्या महागाईला आळा घालण्यासाठी बँक ऑफ इंग्लंडने गुरुवारी व्याजदरात 0.50 टक्क्यांची वाढ केली आहे. तर याआधी अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हनेही महागाई नियंत्रणात आणण्यासाठी व्याजदरातवाढ केली होती.

दरम्यान, जवळपास चार महिन्यांच्या कालावधीत रेपो दरात ही सलग तिसरी वाढ आहे. मे महिन्यात रेपो दरात 0.40 टक्के आणि जूनमध्ये 0.50 टक्के वाढ केली होती.

Leave a Reply

%d bloggers like this: