fbpx

केंद्र सरकार, महागाई आणि ईडी विरोधात काँग्रेसचे आंदोलन

पुणे: केंद्र सरकारने गेल्या दोन-तीन वर्षापासून महागाई व जीवना वशक वस्तूंवरील GST चे दर वाढवले आहेत. त्यामुळे सामान्य जनतेला महागाई चा सामना करावा लागत आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या विरोधात आज अख्ख्या राज्यभर काँग्रेस आंदोलन करत आहे. हे आंदोलन पुण्यात सुद्धा केले गेले.

पुण्यात काँग्रेसने सातारा रोडवरील सिटीप्राईड चौक, भापकर पेट्रोल पंपाजवळ आंदोलन केले. या आंदोलनाच्या वेळी केंद्र सरकारने वाढवलेल्या महागाई विरोधात काँग्रेसने निषेध केला. या आंदोलनाचे नेतृत्व पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी केले. या आंदोलनाला माजी  महापौर कमल व्यवहारे, संगीता तिवारी, नगरसेवक आबा बागुल, नगरसेवक अभय छाजेड, सुनील पंडित, संजय बालगुडे व पुणे शहरातील काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अरविंद शिंदे म्हणाले, केंद्रातील भाजप सरकारच्या मनमानी कारभारामुळे महागाईचा आगडोंब उसळला असतानाच जीवनावश्यक वस्तूंवरही जीएसटी लावून मोदी सरकार सर्वसामान्य जनतेला देशोधडीला लावू पाहत आहे. बेरोजगारीचा उच्चांक झाला असून तरुणवर्गाचे भवितव्य अंधारात आहे. महागाई, बेरोजगारी व ढासळत्या अर्थव्यवस्थेला केंद्र सरकारची चुकीची धोरणे कारणीभूत आहेत. या विरुद्ध आवाज उठवला पाहिजे. राज्यात कुठेही निवडणुका झाल्या तरी. केंद्र सरकारने मागायचे दर कमी करणार नाही. केंद्र सरकारला हा आमचा इशारा आहे. जर थोड्या दिवसात महागाचे दर कमी केले नाहीत तर आम्ही येथील पुढील काळात अख्या पुणे शहरात मोठ्या प्रमाणात आंदोलन करू. असे अरविंद शिंदे म्हणाले.

Leave a Reply

%d bloggers like this: