fbpx

‘कॅट’च्या अध्यक्षपदी रणजित मोरे यांची नियुक्ती

नवी दिल्ली : केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणा (Central Administrative Tribunal)च्या अध्यक्षपदी महाराष्ट्राचे सुपुत्र आणि मेघालय उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश रणजित वसंतराव मोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

श्री.मोरे हे मूळचे सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील निमसोड येथील आहेत.  त्यांचे प्राथमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण निमसोड येथे झाले. त्यानंतर त्यांनी पदवीचे शिक्षण कोल्हापूर येथून पूर्ण केले. तसेच त्यांनी विधीचे शिक्षण सांगलीत घेतले.

1983 मध्ये त्यांनी माजी न्यायाधीश ए.पी. शहा यांच्याकडे अधिवक्ता म्हणून कामाला सुरूवात केली. नंतर मुंबई उच्च न्यायालयातही त्यांनी अधिवक्ता म्हणून काम केले.  अनेक शासकीय संस्थांचे अधिवक्ता म्हणून सरकारची बाजू त्यांनी मांडली. वर्ष 2006 मध्ये श्री. मोरे यांची मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. वर्ष 2020 मध्ये मेघालय येथील उच्च न्यायालयात आधी  न्यायाधीश म्हणून तर वर्ष 2021 मध्ये मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. 30 जुलै 2022 पासून त्यांनी केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण येथील अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली.

Leave a Reply

%d bloggers like this: