Sunday, September 6, 2026
Latest NewsPUNE

कोथुर्णे घटनेतील नराधामला त्वरित फाशी द्यावी- चंद्रशेखर घाडगे

पुणे : कोथुर्णे तालुका मावळ येथील सात वर्षाच्या चिमुकलीचे अपहरण करून तिची हत्या करण्यात आली, या घटनेचा संभाजी ब्रिगेड च्यावतीने जाहीर निषेध आहे, चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करणारा आरोपी हा कोथुर्णे या गावातीलच आहे, त्याला पोलिसांनी अटक केली आहे, गावातच जर असा नराधम असेल तर त्या गावातील मुली खरच सुरक्षित आहेत का? याचा पोलिसांनी विचार केला पाहिजे, त्या आरोपीवर त्वरित कठोर कारवाई झाली पाहिजे,

जेणे करून यापुढे कोणाची वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत होणार नाही, या दुर्दैवी घटनेने मावळ तालुका आणि जिल्ह्यात संतपाची लाट उसळली आहे, जनतेच्या तीव्र भावना लक्षात घेऊन या आरोपीला कोणतीच संधी न देता त्याला त्वरित फाशी द्यावी, तरच त्या चिमुकलीला खरा न्याय असेल, त्या आरोपीला जे लोकं पाठीशी घालतील त्याला संभाजी ब्रिगेड च्या स्टाईलने उत्तर देण्यात येईल, कामशेत तालुका मावळ पोलिसांनी त्या नाराधमाची कातडी सोलून काढावी, तरच येथून पुढे, आशा घटना टाळता येतील कारण एखादा आरोपी अत्याचार करून खून करतो आणि नंतर त्याला पाहुणचार देऊन न्यायालयात हजर करतात नंतर तो खटला चालतो मग त्याला फाशीची शिक्षा होते, मग ती लगेच अमलात न आणता त्याला वर्षा नुवर्षे खाऊ – पिऊ घातले जाते, पिडीत कुटुंब वर्षांनुवर्षे न्यायाच्या प्रतिक्षेत असते, त्यामुळे गुन्हेगाराना भिती राहिलेली नाही, कोथुर्णे येथील घटनेतील आरोपीला त्वरित फाशी देऊन त्या कुटुंबाला न्याय द्यावा, अशी मागणी संभाजी ब्रिगेड चे पुणे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे यांनी केली,“`

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading