Thursday, May 7, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

या हल्लेखोरांना कोणी पाठवलं होतं त्यांची सविस्तर चौकशी झाली पाहिजे- उदय सामंत

पुणे : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यात शिवसेनेतील ठाकरे गट आणि शिंदे गटात वाक् युद्ध सुरू असताना आज पुण्यातील या दोन्ही गटातील वाद शिगेला पोहचला. हल्ल्यानंतर उदय सामंत यांनी त्यावेळी नेमकं काय झालं याबद्दल पत्रकारांना माहिती दिली आहे.
त्यांना पोलिसांनी अडवल्यानंतर ते गाडीच्या मागच्या बाजूने केले आणि त्यांनी बेसबॉल स्टीकने गाडी फोडली. माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला परंतु सिग्नल सुरु झाल्यानंतर मी गाडी घेऊन पळालो. पण त्यांचा हेतू वाईट होता. मला असं वाटत नाही की त्यांना कुणी पाठवलं होत.पण याची सविस्तर चौकशी झाली पाहिजे. असे उदय सामंत म्हणाले आहेत.
उदयसामंत म्हणाले की. माझा ताफा कोणी आडवला नाही.गाडी सिग्नलला थांबलेली होती. तेव्हा काही गाड्यामध्ये शिवसैनिक बेसबॉलच्या स्टीक आणि आणि दगड घेऊन आले. त्यांनी गाड्यांवर हात मारायला.मला शिवीगाळ करायला सुरुवात केली.हल्लेखोर पोलिसांच्या अंगावर आल्याचे सामंत म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading