आदित्य ठाकरे हा एक दिवस तुमचा बाप झाल्याशिवाय राहणार नाही -सचिन अहिर
पुणे : आदित्य ठाकरे यांची संवाद यात्रा आज पुण्यात पोचली. तेव्हा आदित्य ठाकरे यांची पुण्यात सभा आयोजित केली होती. शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख व आमदार सचिन अहिर यांनी पण शिवसैनिकांना व जनतेला संबोधित केले.
सचिन अहिर म्हणाले,एकेकाळी जे मंत्री होण्यासाठी रडत होते. पाय धरत होते ते आज विचारतायेत आदित्य ठाकरे कोण? मात्र तुम्हाला आत्ता सांगतो आदित्य ठाकरे हा एक दिवस तुमचा बाप झाल्याशिवाय राहणार नाही.अशी घणाघाती टीका सचिन आहिर यांच्याकडून करण्यात आली.
यावेळी टीका करताना सचिन आहिर म्हणाले, पुरंदर तालुक्यातील झोपे गेलेला एकजण जागा झाला. तर त्यांनी पुरंदर मध्ये आज शहाजी बापू पाटलांच्या भाषणाचाही समाचार घेतला आहे. बापू तुमचं वागणं बरं नाही. ज्या ताटात जेवला त्याच ताटात मिठाचा खडा टाकला. जनता तुम्हाला माफ करणार नाही, अशा भाषेत सचिन अहिर यांनी शहाजी पाटलांनाही इशारा दिला.
भाजपचे राष्ट्रीय नेते जेपी नडा यांनी काही घटक पक्ष हे लवकरच संपतील असे विधान केले होते. त्यावर सचिन अहिर म्हणाले,तसेच जेपी नड्डा यांनी महाराष्ट्रात येऊन पहावं शिवसेना संपली आहे का? ही गर्दी पाहून ठरवावं असं थेट आव्हान सचिन अहिर यांनी जेपी नड्डांना दिलं.
