पर्वती विधानसभा मतदारसंघ युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी केतन जाधव
पुणे:महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या निवडणूकीमध्ये पर्वती विधानसभा मतदारसंघ युवक काँग्रेसच्या केतन जाधव यांची अध्यक्ष पदी भरघोस मतांनी निवडून आल्याबद्दल आज पुणे काँग्रेस भवनमध्ये महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .यावेळी प्रदेश प्रभारी मितेंद्रभाई सिंहजी, शहर अध्यक्ष राहुलजी शिरसाठ उपस्थित होते.
केतन जाधव म्हणाले,महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या निवडणूकीमध्ये पर्वती विधानसभा मतदारसंघ युवक काँग्रेसच्या अध्यक्ष पदी मी भरघोस मतांनी निवडून आलो याचा मला भरपूर आनंद होत आहे. मी येणाऱ्या पुढील काळात अधिक जोराने काम करणार आहे व महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे उमेदवार कसे जास्तीत जास्त निवडून येतील हे बघणार आहे. असे केतन जाधव म्हणाले.
