fbpx

 PMPML – बाजीराव रोड, शिवाजी रोडमार्गे जाणाऱ्या बसेसच्या मार्गांमध्ये बदल

पुणे :  पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात असणाऱ्या बाजीराव रोड/शिवाजी रोड वरील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने
पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून बाजीराव रोडमार्गे संचलनात असलेल्या मार्गांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

बाजीराव रोडमार्गे संचलनात असणारा मार्ग क्र. २ स्वारगेट ते शिवाजीनगर (पुण्यदशम बससेवा) वगळून खालील
तक्ता क्रमांक १ मध्ये नमूद केलेले मार्ग जाताना दांडेकर पूल, शास्त्री रोड, फर्ग्युसन रोड व येताना जंगली महाराज रोडने डेक्कन टिळकरोड मार्गे तसेच तक्ता क्रमांक २ मध्ये नमूद केलेले बसमार्ग जाताना टिळकरोड, फर्ग्युसन रोड व येताना जंगली महाराज रोडने डेक्कन टिळकरोड मार्गे गुरुवार, दि. २८ जुलै २०२२ पासून संचलनात राहणार आहेत.

तक्ता क्रमांक १
अ.क्र. मार्ग क्रमांक पासून पर्यंत
१ २ अ कात्रज ते शिवाजीनगर
२ ११ मार्केटयार्ड ते पिंपळेगुरव
३ ११ अ मार्केटयार्ड ते कासारवाडी रेल्वे स्टेशन
४ ११ क कात्रज ते पिंपळेगुरव
५ २१ स्वारगेट ते सांगवी
६ ३० मार्केटयार्ड ते घोटावडे फाटा
७ २९८ कात्रज गुजरवाडी ते चिंचवड गाव

तक्ता क्रमांक २
अ.क्र. मार्ग क्रमांक पासून पर्यंत
१ २० सहकारनगर ते संगमवाडी
२ ३७ सहकारनगर ते न.ता.वाडी
३ ६८ अप्पर डेपो ते सुतारदरा

Leave a Reply

%d bloggers like this: