Saturday, October 24, 2026
Latest NewsMAHARASHTRANATIONALTOP NEWS

राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल यांच्या मुंबईतल्या घरावर ईडीची टाच

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रसचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे. प्रफुल्ल पटेलांचं मुंबईतील वरळी भागातील सीजे हाऊसमधील घरही ईडीकडून जप्त करण्यात आलं आहे. इक्बाल मिरची प्रकरणी ईडीने प्रफुल्ल पटेलांवर ही कारवाई केली आहे. यासंबंधीत प्रफुल्ल पटेलांची चौकशीही झाली होती. मुंबईतील सीजे हाऊसमधील चौथ्या मजल्यावरील प्रफुल्ल पटेलांच्या घरावर ईडीने टाच आणली आहे.प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे ते अतिशय निकटवर्तीय आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शरद पवार यांच्यानंतर त्यांना च अतिशय महत्त्व असते. सध्या ते राष्ट्रवादीचे राज्यसभेवर खासदार आहेत. युपीएचे सरकार सत्तेत होते तेव्हा पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या कार्यकाळात ते विमानऊड्डाण मंत्री होते.

वरळी मधील सीजे हाऊसमधील प्रफुल्ल पटेलांचे घर जप्त करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वीच हे प्रकरण समोर आले होते, त्यापार्श्वभूमीवर ईडीने ही कारवाई केली आहे. प्रफुल्ल पटेल हे सध्या मुंबईतच असून, काही वेळापूर्वी ते वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये दिसले होते.अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय इकबाल मिर्चीने बेकायदा पद्धतीने वरळीमधील तीन मालमत्तांच्या विक्रीचा व्यवहार केला आणि त्यात काळा पैशांचा व्यवहार करण्यात अनेकांनी त्याला मदत केल्याचा आरोप आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading