Saturday, October 24, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

वरूण सरदेसाई यांची हकालपट्टी करत शिंदे यांनी युवासेनेच्या सचिवपदी केली किरण साळी यांची नियुक्ती

 

पुणे:मुख्यमंत्री एकनाथसाहेब शिंदे यांच्या नंदनवन या शासकीय निवासस्थानी पुणे शहर व जिल्हातील हजारो कार्यकर्ताच्या उपस्थीतीत मेळावा पार पडला.या मेळाव्यास राज्यभरातुन एकनाथ शिंदे समर्थक मोठया संख्येने उपस्थीतीत होते.शिवसेनेमधील बंडाळी नंतर पुणे जिल्हा व शहर शिवसेनेला देखील मोठे खिंडार पडले आहे.यावेळी शिवसेना राष्ट्रीय कार्यकारणी समितीचे माजी मंत्री उदय सामंत, विजय शिवतारे,,तसेच आमदार भरतशेठ गोगावले ,संजय शिरसाठ , प्रकाश सुर्वे , बालाजी कोनाक्री, रविंद्र फाटक यांच्या प्रमुख उपस्थीतीत पार पडलेल्या या वेळी मेळाव्यात शिवसेनातील अनेक पदाधीकार्‍यांनी जाहीर समर्थन दिले.
यावेळी मुख्यमंत्री यांनी रमेश कोंडे यांची पुन्हा एकदा जिल्हाप्रमुख पदी, नाना भानगिरे यांची शहरप्रमुखपदी, अजय भोसले यांची जिल्हा व शहर सह-संपर्कप्रमुखपदी तर किरण साळी यांची युवासेना महाराष्ट्र राज्य सचिवपदी नियुक्ती करण्याचा निर्णय याप्रसंगी जाहीर केला.
यावेळी माजी आमदार विजय शिवतारे, आमदार भरतशेठ गोगावले, आमदार उदय सामंत, आमदार संजय शिरसाट, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार सदा सरवणकर, आमदार रवींद्र फाटक, आमदार डॉ.बालाजी किणीकर, ठाणे महानगरपालिका माजी महापौर नरेश म्हस्के, रमेश कोंडेश्वर, किरण साळी, नाना भानगिरे आणि पुणे जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी आवर्जून उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading