सोनी ला भारतात बर्मिंगहॅम २०२२ कॉमनवेल्थ गेम्सच्या प्रसारणासाठी मिळाले टीव्ही व डिजिटल अधिकार
मुंबई : सोनी पिक्चर्स नेटवर्क्स इंडिया (एसपीएन)ला बर्मिंगहॅम २०२२ कॉमनवेल्थ गेम्सच्या प्रसारणासाठी विशेष टीव्ही व डिजिटल अधिकार मिळाले आहेत. या मल्टी-स्पोर्टिंग इव्हेण्टचे २२वे पर्व २८ जुलै ते ८ ऑगस्ट २०२२ पर्यंत खेळवण्यात येणार आहे. हा करार एसपीएनला भारतामध्ये, तसेच पाकिस्तान, श्रीलंका, बांग्लादेश, नेपाळ, अफगाणिस्तान, भूतान व मालदीव अशा देशांसह उपखंडामध्ये गेम्सचे प्रसारण करण्याचे विशेष अधिकार देतो. या कॉमनवेल्थ गेम्सचे लाइव्ह स्ट्रिम त्यांचा प्रिमिअम ओटीटी व्यासपीठ सोनीलिव्हवर देखील उपलब्ध असेल.
या चतुर्वार्षिक इव्हेण्टमध्ये ७२ देशांचा सहभाग असेल आणि इव्हेण्टच्या ११ दिवसांमध्ये आठ पॅरा-स्पोर्टससह १९ खेळांचा समावेश असेल. अॅथलेटिक्स, बॅडमिंटन, जलतरण, बास्केटबॉल, बॉक्सिंग, कुस्ती, हॉकी, ज्युडो आणि इतर खेळ यांमध्ये स्पर्धा घेतली जाईल. बर्मिंगहॅम २०२२ कॉमनवेल्थ गेम्समध्ये बास्केटबॉल ३x३, व्हीलचेअर बास्केटबॉल ३x३, बीच व्हॉलीबॉल आणि पॅरा टेबल टेनिस यांसारखे खेळ असणार आहेत. याव्यतिरिक्त महिला क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) आणि बर्मिंगहॅम आयोजन समितीने टी२० स्वरूपामध्ये महिला क्रिकेटचा समावेश करण्याची घोषणा केली. आयसीसीने बर्मिंगहॅम २०२२ स्पर्धेला पूर्णपणे मंजूरी दिली आहे.
गेल्या दोन दशकांमध्ये भारताने कॉमनवेल्थ गेम्समधील पदकतालिकेत स्थिर वाढ पाहिली आहे. भारतीय संघाने २०१० कॉमनवेल्थ गेम्समध्ये १०१ पदकांसह सर्वात यशस्वी मोहिम संपादित केली. भारताची पुढील यशस्वी कामगिरी म्हणजे देशाने २०१८ कॉमनवेल्थ गेम्समध्ये गुणतालिकेमध्ये तिसरे स्थान पटकावले, जेथे भारतीय संघाने ६६ पदके पटकावण्यासह नॉन-होस्ट देश म्हणून सर्वोत्तम कामगिरी केली.
मते:
राजेश कौल, प्रमुख महसूल अधिकारी, वितरण आणि प्रमुख – स्पोर्टस् बिझनेस, सोनी पिक्चर्स नेटवर्क्स इंडिया:
”बर्मिंगहॅम २०२२ कॉमनवेल्थ गेम्सच्या मीडिया अधिकारांचे संपादन आमच्यासाठी अभिमानास्पद क्षण आहे. आपल्या देशवासीयांना आमच्या नेटवर्कवर देशातील सर्वात मोठ्या स्पोर्टिंग हिरोंना यशाच्या नवीन शिखरावर पोहोचताना पाहायला मिळेल. रेकॉर्ड-ब्रेकिंग ऑलिम्पिक गेम्सनंतर आपला प्रवास आता बर्मिंगहॅम २०२२ कॉमनवेल्थ गेम्ससह पुढे सरकेल आणि आम्हाला विश्वास आहे की, आपला भारतीय संघ मोठे यश संपादित करेल. गेम्सचे २०२२ पर्व भारतीय प्रेक्षकांसाठी अत्यंत लक्षणीय आहे, कारण महिला क्रिकेट टी२० स्वरूपामध्ये या चतुर्वार्षिक इव्हेण्टमध्ये पदार्पण करत आहे आणि भारतातील सर्वोत्तम महिला क्रिकेटर्स टीम इंडियाचे प्रतिनिधित्व करताना पाहायला मिळणार आहे.”
डेव्हिड लेदर, सीईओ, कॉमनवेल्थ गेम्स फेडरेशन पार्टनरशीप्स:
”आम्हाला आनंद होत आहे की, सोनी पिक्चर्स नेटवर्क्स इंडिया देशभरात बर्मिंगहॅम २०२२ कॉमनवेल्थ गेम्सचे विशेष प्रसारण करणार आहे. भारतातील अव्वल अॅथलीट्स बर्मिंगहॅम २०२२ मध्ये स्पर्धा करणार आहेत, जसे नीरज चोप्रा व हरमनप्रीत कौर. म्हणून सोनी जागतिक दर्जाची क्रीडा देशभरातील लाखो लोकांच्या घरांमध्ये घेऊन जाणार आहे, जे अप्रतिम आहे.
हा सहयोग विशेषत: महत्त्वपूर्ण आहे, कारण भारत हा कॉमनवेल्थमधील सर्वात मोठा व सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आणि कॉमनवेल्थ स्पोर्ट मूव्हमेंटमधील रीअल लीडर आहे. हा करार बर्मिंगहॅम २०२२ आणि कॉमनवेल्थ स्पोर्ट मूव्हमेंटच्या भावी दिशेमध्ये मोठा आत्मविश्वास निर्माण करतो. म्हणून आम्हाला या उत्साहवर्धक व्हेंचरमध्ये सहयोगाने काम करण्याचा आनंद होत आहे.”
पहा बर्मिंगहॅम २०२२ कॉमनवेल्थ गेम्सचे थेट प्रक्षेपण २८ जुलै २०२२ ते रात्री ११.३० वाजता सोनी सिक्स, सोनी टेन १, सोनी टेन २, सोनी टेन ३ आणि सोनी टेन ४ चॅनेल्सवर.