fbpx

आयआयएल तर्फे शिनवा आणि इझुकी पिक कीटकनाश संरक्षक उत्पादने बाजारात दाखल   

पुणे : भारतातील आघाडीची  पिक संरक्षण कंपनी  इन्सेक्टीसाईड्स (इंडिया) लिमिटेड (आयआयएल)  तर्फे  शेतपीक संरक्षणासाठी  दोन नवीन उत्पादने बाजारात सादर केली आहेत जपानमधील निस्सान केमिकल कॉर्पोरेशनच्या तांत्रिक सहकार्याच्या  माध्यमातून शिनवा  आणि  इझुकी   हि कीटकनाशके  विकसित  करण्यात आली आहेत शिनवा हे एक अनोख्या  पद्धतीचे  कीटकनाशक असून हे कीटकनाशक विविध पिकांवरील थ्रीप्स आणि लेपिडोप्टेरन कीटकांचा अत्यंत प्रभावीपणे नाश करते. शिनवाच्या प्रत्यक्ष प्रभावामुळे शेतपिकावर अत्यंत चांगल्या पद्धतीने    नियंत्रण  मिळवता येते  त्यामुळे इतर किटकनाशकांच्या तुलनेत  हे कीटकनाशक  अधिक काळासाठी नियंत्रण मिळवून देते.

शिनवा हे ‘आयआयएल’साठी एक अत्यंत महत्त्वाचे असे उत्पादन असून बाजारपेठेतील इतर संधी प्राप्त करून देणारा आहे  असून त्यात वांगी, भेंडी, मिरची, टोमॅटो, कोबी आणि लाल हरभरा आदी मोठ्या प्रमाणावरील पिकांचा समावेश असेल.इझुकी हे विस्तृत कक्षांचे बुरशीनाशक असून त्यांत उत्तम असे प्रोफीलॅक्टीक आणि क्युरेटीव्ह गुणधर्म सामावले आहेत. इझुकी हे भाताला ब्लास्ट आणि भात पोला (शिथ ब्लाइट) यांच्यासारख्या रोगांपासून संरक्षण देते. इझुकी हे पर्यावरणासाठी अत्यंत सुरक्षित असे कीटकनाशक आहे.

इन्सेक्टीसाईड्स (इंडिया) लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक  राजेश अगरवाल म्हणाले की शिनवा आणि इझुकी ही दोन उत्पादने दाखल केल्याचा आम्हाला अतिशय आनंद आहे. भारतीय शेतकऱ्यांच्या सेवेमध्ये आंतरराष्ट्रीय उत्पादने दाखल करण्याची आमच्या कंपनीची बांधिलकी यातून अधोरेखित होते. निस्सानबरोबरची आमची भागीदारी २०१२मध्ये सुरु झाली आणि आम्ही चार उत्पादने आत्तापर्यंत दाखल केली आहेत. त्यांमध्ये पुल्सोर, हकामा, कुनोयची आणि हचीमन या उत्पादनांचा समावेश असून आम्ही लवकरच आणखी दोन उत्पादने दाखल करणार आहोत. या जपानी तंत्रज्ञान उत्पादनांना आम्हाला खूप चांगला प्रतिसाद लाभतो आहे.

इन्सेक्टीसाईड्स (इंडिया) लिमिटेडचे वरिष्ठ महाव्यवस्थापक संजय सिंग म्हणाले की उच्च आणि कमी तापमानाच्या प्रदेशांमध्येही शिनवा प्रभावी आहे. त्याशिवाय दोन तासांपर्यंत पावसाचा मारा झेलण्याची क्षमताही या किटकनाशकात आहे. हे उत्पादन पिकाच्या वरील भागात तत्काळ मुरते आणि त्यामुळे पावसाळी मोसमासाठी ते फवारल्यानंतर अधिक प्रभावी ठरते. शिनवा हे झपाट्याने कार्यक्षम ठरणारे कीटकनाशक असून ते कीटकांना पिकांचे नुकसान करण्यापासून रोखते. हे कीटक फवारणीपासून केवळ काही तासांमध्येच मरू लागतात.

Leave a Reply

%d bloggers like this: