fbpx

एक गृहिणीसुद्धा व्यवसायात यशाचं शिखर गाठू शकते – कबीता सिंग

पुणे : घरात बसून सुद्धा तुम्ही तुमच्या कला गुणांना वाव देऊन , सोशल मीडिया अगदी व्यवस्थित उपयोग केल्यास एक गृहिणी सुद्धा व्यवसायात यशाचे शिखर गाठू शकते असे मत यू ट्यूब वर 14 लाखापेक्षा ही जास्त फॉलोअर असणाऱ्या पाककला मध्ये यशस्वीपणे कलेच्या माध्यमातून यशाचे शिखर गाठणाऱ्या काबिताच किचन च्या काबिता सिंग यांनी मांडले .त्या फिक्की महिला आघाडीच्या वतीने आयोजित महिला उद्योजिकासाठी डिजिटल मार्केटिंग ,प्रमोशन व जाहिरात बाबत आयोजित परिषदेत बोलत होत्या.

पुढे त्या म्हणाल्या की ,पती नोकरीला गेल्यावर घरात बसून काय करायचं असा प्रश्न मला पडत असे .मी पाककला करून ते यू टुब द्वारे सोशल मीडिया प्रसारित करीत होते परंतु सुरुवातीला लोक मला हिणवत होते पण मी धीर न सोडता सातत्य ठेवले आणि चुका दुरुस्त केल्या आज माझ्या माध्यमाचे लाखो फोलॉअर आहेत .त्यामुळे आपण ही आपल्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी सोशल मीडियाचा योग्य वापर केल्यास आपला व्यवसाय नक्कीच मोठ्या प्रमाणात वाढू शकतो .
यावेळी ट्रॅव्हल आणि मार्केटिंग मध्ये प्रसिध्द असणाऱ्या अनिषा मल्होत्रा जैन यांनी सोशल मीडियातील अनेक तांत्रिक बाबी चे मार्गदर्शन महिलांना केले . यू ट्यूब ,फेसबुक ,इंस्टाग्राम ,ट्विटर यासारख्या माध्यमाचा लोकांपर्यत पोहचण्यासाठी तसेच आपला व्यवसाय व कलेसाठी तुम्ही अतिशय योग्य आणि एक अतिशय चांगला पर्याय निर्माण करू शकता.

या कार्यक्रमाचे आयोजन फिक्की महिला आघाडीच्या अध्यक्षा नीलम शेवलेकर यांनी केले होते .यावेळी सचिव सोनिया राव,करीना शेवानी, निशिता मंत्री , पिंकी राजपाल ,अनिता अग्रवाल आणि पुणे शहरातील फिक्की महिला पदाधिकारी आणि महिला उद्योजक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते .

Leave a Reply

%d bloggers like this: