Wednesday, June 10, 2026
Latest NewsPUNE

वसंत मोरे यांच्या वडापाव आणि चहामहोत्सव चा आस्वाद घेण्यासाठी गर्दी

पुणे:वडापाव आणि चहामहोत्सव अशाप्रकारचा पुण्यातला हा पहिलाच कार्यक्रम आहे. दोन-तीन महिन्यापूर्वी राज ठाकरे यांनी मिसळ महोत्सवाबाबत मार्गदर्शनन केले होते. मात्र त्यानंतर राज ठाकरेंचे ऑपरेशन झाले. त्यामुळे राज ठाकरे पुण्यात आले नाहीत, मात्र नागरिकांकडून या महोत्सवाला भरघोस प्रतिसाद मिळत आहे, असे मनसेचे नेते
वसंत मोरे म्हणाले.

प्रभाग 56, 57 आणि 58 यांच्यावतीने वसंत मोरे यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता, त्यावेळी ते बोलत होते. पुण्यातील कात्रज परिसरात हा महोत्सव आयोजित करण्यात आला. पावसाळा असल्यामुळे वडापाव आणि चहा महोत्सवाला पुणेकरांनी तुफान गर्दी केली. अशा पद्धतीने शहरात वेगवेगळ्या भागात वडापाव महोत्सवाचे आयोजन करणार असल्याचे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी सांगितले.
यांनी सांगितले.
पावसाच्या आल्हाददायक वातावरणात गरमागरम वडापाव आणि चहा घेण्यासाठी पुणेकरांनी याठिकाणी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे काही स्टॉल्सवरचे वडापाव लवकर संपले. त्यामुळे या स्टॉलधारकांनी आपले राखीव खेळाडू आपल्या हॉटेलमध्ये पाठवून द्या. माल कमी पडू देऊ नका. रांग मोठी आहे. इथे आलेल्या प्रत्येकाला सिंगल वडापाव तरी मिळेल, याची आपण काळजी घ्या, आम्ही संध्याकाळी जाताना तुमची काळजी घेऊ. येवले चहावाल्यांना दोन चारवेळा माल आणायला जावे लागले. त्यांनी जवळची एखादी फ्रँचायझी बंद ठेवा. पण इथे कमी पडू देऊ नका, असे वसंत मोरे म्हणताच हशा पिकला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading