Monday, June 15, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

जीवनावश्यक वस्तुंवरील जीएसटी विरोधी संघर्षात काँग्रेस व्यापारी वर्गा सोबत – नाना पटोले

मुंबई : देशातील महागाई मुळात प्रचंड प्रमाणात वाढत असतांना, जीवनावश्यक वस्तूंवर ‘जाचक जीएसटी’ लावण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णया विरोधात राज्यातील व्यापारी, दुकानदार रस्त्यावर ऊतरले असून, संघर्ष करीत आहेत.. या त्यांच्या संघर्षात राज्यातील काँग्रेस त्यांचे सोबत असून, ‘जीएसटी विरोधी व्यापारी आंदोलनास’ प्रदेशाध्यक्ष मा नाना पटोले यांनी पाठिंबा जाहीर केल्याचे, काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात सांगीतले..!

मुळात महागाई वाढत आहे, त्यात पुन्हा बेरोजगारी दर वाढत आहे.. भाजप सरकारने पेट्रोल – डीझेल एक्साईज कर मुळात कीत्येक पटीने वाढवले असून, जनतेची लुट चालू आहे.. पुन्हा घरगुती गॅस दरवाढ चालूच असून, विज दर देखील राज्यातील ‘अतिरेकी भाजप सरकार’ने वाढवले आहेत. त्यामुळे गरीब – मध्यमवर्गीयांचे आर्थिक बजेट कोलमडते आहे.
केंद्र सरकार परकीय वस्तू, ऊत्पादनांना ‘रेड कार्पेट’ टाकत असून, आयात प्रचंड वाढत आहे व तुलनेत निर्यात कमी होत आहे.. बँकांचे कोट्यावधींचे घोटाळे पुढे येत असून, देशाचा पैसा व संपत्ती घेऊन पसार झालेल्यांना केंद्र सरकार अद्यापही पकडू वा आणू शकलेली नाही. परीणामी, देशाची आर्थिक स्थिती कोलमडत असल्यामुळे अर्थव्यवस्था वाचवण्यासाठी केंद्र सरकार आता सामान्यांच्या जीवावर ऊठले असून, देशात प्रथमच जीवनावश्यक वस्तुंवर जीएसटी रूपाने ‘झिजीया कर’ लावून, सामान्यांना लुटण्याचे कुकर्म मोदी-शहांचे केंद्र सरकार करत असून, जीवनावश्यक अन्नधान्य-वस्तुंवरील ५% दीसणारा जीएसटी अंमलबजावणीत नागरीकांपर्यंत पोहोचतांना ८-१० % पर्यंतची झळ सर्व सामान्यांना पोहोचणार असल्याने, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस या तुघलकी जीएसटी आकारणीचा ‘तिव्र निषेध’ करत असल्याचे ही राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात सांगितले..

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading