fbpx

बँक ऑफ इंडियातर्फे कर्जवसुली  मोहिम सुरू 

पुणे : बँक ऑफ इंडियाच्या वतीने कर्जाची थकबाकी असलेल्या थकबाकीदारांकडून कर्जवसुलीची मोहीम उघडण्यात आली आहे त्याचा प्रारंभ बुधवारपासून करण्यात आला आहे
बँक ऑफ इंडियाच्या कर्वे रोड शाखेतर्फे आकुर्डी येथील प्रसिद्ध रुग्णालय न्यूरो स्टार या रुग्णालयावर महिला शक्ती नारी मोर्चा व बँकेच्या वसुली पथकातर्फे या रुग्णालयावर भर मुसळधार पावसात मोर्चा काढण्यात आला रुग्णालयाचे प्रमुख डॉ अमित वाघ याना या पथकातील कर्मचाऱ्यांनी येत प्रत्यक्ष भेटून कर्जाची थकबाकी बँकेत भरण्याची विनंती केली यावेळी बँकेच्या महिला नारी शक्ती मोर्चाच्या व वसुली पथकाच्या कर्मचाऱ्यांनी हातात फलक घेऊन काही वेळ निदर्शने ही केली या कारवाई मोहिमेत बँक ऑफ इंडियाच्या झोनल ऑफिसचे डेप्युटी मॅनेजर श्री गुजर यांच्या नेतृत्वाखाली बँक ऑफ इंडियाच्या कर्वे रोड शाखेतील कर्मचारी, महिला शक्ती नारी मोर्चाचे व वसुली पथकाचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते

Leave a Reply

%d bloggers like this: