fbpx

अॅमेझॉन आणि उबरमध्ये भागीदारीची घोषणा

पुणे : अॅमेझॉन आणि उबर या जागतिक पातळीवरील असोसिएशनतर्फे अॅमेझॉन प्राईम डे च्या निम्मिताने विस्ताराची घोषणा  करण्यात आली आहे.   तसेच उबरवर प्राइम सदस्यांसाठी विशेष ऑफर सुरू करण्यात  आला आहे . विद्यमान अॅमेझॉन-उबर असोसिएशनचा एक भाग म्हणून, प्राइम सदस्यांना उबरगो च्या किमतीत, दरमहा ३ अपग्रेडसह उबर प्रीमियर मध्ये प्रवेश मिळेल. याव्यतिरिक्त, ते उबर ऑटो, मोटो, रेंटल्स आणि इंटरसिटीवर दर महिन्याला ३ ट्रिपसाठी वैध आयएनआर ६०पर्यंत २० टक्क्यांची  सवलत देखील मिळवू शकणार आहेत . या दोन्ही ऑफर उबरवर अॅमेझॉन पे वॉलेट कनेक्ट करून आणि पे वॉलेट बुकिंग ट्रिपसाठी वापरता येऊ शकते .

सर्वत्र प्रवास सुरू झाल्यामुळे आणि प्रवासाच्या विविध केसेस पूर्ण सुरळीत झाल्याने, प्राइम सदस्यांना मदत करण्यासाठी आणि त्यांचा प्रवास फायदेशीर बनवण्यासाठी या स्पेशल ऑफरची रचना केली गेली आहे. अधिक प्रवासाची मागणी पूर्ण करण्यासाठी, प्राइमवर खास ऑफर अॅमेझॉन इंडियाच्या बहुप्रलंबित आणि बहुअपेक्षित अशी वार्षिक दोन-दिवसीय शॉपिंग इव्हेंट प्राइम सदस्यांसाठी  २३ आणि २४ जुलै, २०२२ रोजी प्राइम डेच्या आधी सुरू करण्यात आली आहे. या ऑफर अॅमेझॉन वर उपलब्ध असतील. अॅमेझॉन पे आणि उबर वापरून पेमेंट करणारे प्राइम सदस्य भारतभर त्यांचे राइडशेअरिंग पार्टनर म्हणून काम करतील.

अॅमेझॉन इंडियाचे प्राइम अँड डिलिव्हरी एक्सपिरियन्स संचालक अक्षय साही म्हणाले की आमच्‍या प्राइम सदस्‍यांना त्‍यांचे दैनंदिन अनुभव अधिक चांगले बनवण्‍यासाठी अ‍ॅमेझॉन प्राइमचा सतत प्रयत्‍न आहे, मग ते फ्री फास्‍ट डिलिव्‍हरी, अनन्य खरेदी, ब्लॉकबस्टर एंटरटेन्मेंट किंवा जाहिरात-मुक्त संगीत असो. आम्ही हे जाणतो की प्राइम सदस्य नेहमी प्रवास करत असतात आणि या सहवासामुळे ते उबरसह त्यांच्या प्रवासात आणखी आराम आणि सोयींचा आनंद घेऊ शकतात. आम्ही भारतातील आमच्या सहाव्या प्राइम डेची तयारी करत आहोत जो सर्व प्राइम सदस्यांसाठी अधिक मोठा, चांगला आणि अतुलनीय शॉपिंग आणि मनोरंजन ऑफरने परिपूर्ण असणार आहे.

उबर इंडिया दक्षिण आशिया  व्यवसाय विकास  संचालक अभिलेख कुमार म्हणाले की “आम्हाला अॅमेझॉन सोबतची आमची धोरणात्मक भागीदारी त्याच्या प्राइम ग्राहकापर्यंत वाढवताना आनंद होत आहे, ज्यामध्ये उबर वर या सेगमेंटला खरोखरच वेगळा अनुभव देण्याचा दृष्टीकोन आहे. लॉन्च ऑफर हे त्या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: