fbpx

‘न्यू इंग्लिश स्कूल’मध्ये साकारणार फुलपाखरू उद्यान

पुणे : ‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी’च्या ‘न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड प्रशाले’तील गोल बागेत फुलपाखरू उद्यान निर्मिती प्रकल्पाला सुरुवात झाली. या बागेत फुलपाखरांना आकृष्ट करणार्‍या रोपांची लागवड करण्यात आली. बागेतील रोपांच्या शास्त्रीय नावांचे फलक लावण्यात आले. पुढीन दोन महिन्यांत फुलपाखरू उद्याण विकसित होईल, असा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. मुख्याध्यापिका दर्शना कोरके, फर्ग्युसनच्या पर्यावरण विभाग प्रमुख रूपाली गायकवाड, फुलपाखरांचे अभ्यासक रजत जोशी, पर्यावरण प्रमुख अवंती बाचीम यांचे विशेष सहकार्य लाभले.

Leave a Reply

%d bloggers like this: