Saturday, October 24, 2026
Latest NewsPUNE

‘न्यू इंग्लिश स्कूल’मध्ये दहावी गुणवंताचा सत्कार

पुणे : ‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी’च्या ‘न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड प्रशाले’तील इयत्ता दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. महेश नलावडे, तनया नलावडे आणि अद्वैत बंबोली प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शाला समितीचे अध्यक्ष खेमराज रणपिसे अध्यक्षस्थानी होते. आत्मविश्वास, जिद्द आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर यश निश्चित मिळते, असे मत बंबोली यांनी व्यक्त केले. ‘राष्ट्रीय छात्र सेने’च्या प्रावीण्य संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. मुख्याध्यापिका दर्शना कोरके यांनी प्रास्ताविक, पर्यवेक्षिका अनिता भोसले यांनी स्वागत, उपशाला प्रमुख सुधीर विसापुरे यांनी आभार आणि प्रवीण रांगोळे यांनी सूत्रसंचालन केले. शिक्षक-पालक संघाचे विशेष सहकार्य लाभले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading