fbpx

महिंद्रा लाइफस्पेस तर्फे पुण्यातील पहिली बायोफिलिया-प्रेरित घरे सादर

पुणे : महिंद्रा समूहाची बांधकाम क्षेत्र आणि पायाभूत सुविधा विकास शाखा महिंद्रा लाइफस्पेस डेव्हलपर्स लिमिटेडने आज आपली संपूर्णपणे मालकीची उपकंपनी महिंद्रा ब्लूमडेल डेव्हलपर्स लिमिटेडच्या द्वारे पुण्यातील पहिली बायोफिलिया प्रेरित घरे पिंपरी येथे सादर केली. निसर्गाशी मानवाच्या सहज संबंधाने प्रेरित होणे याला बायोफिलिया म्हणतात. त्यासाठी प्रकल्पाचे घटक नैसर्गिक साहित्य, पोत, नमुने आणि आकार यांनी प्रेरित असतात. शाश्वत भविष्य घडवताना जुन्या आठवणींना उजाळा देतात. या सहयोगातून महिंद्रा नेस्टॅल्जिया येथील घरे एखाद्याच्या बालपणाची आठवण करून देणारी सक्रिय आणि निरोगी जीवनशैलीला पोषक असतील  आणि तरुण पिढ्यांमधील रहिवाशांना तशाच प्रकारचे जीवन आणि समुदाय अनुभव घेण्यास सक्षम करतील.

नॉस्टॅल्जिया-प्रेरित सौंदर्यशास्त्रासह डिझाइन केलेली ही बायोफिलिया-प्रेरित घरे शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिक स्वास्थ्य सक्षम करतील. स्वातंत्र्य, कुतूहल आणि निरागसतेच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देणाऱ्या सुविधांमध्ये हॉपस्कॉच, सन डायल, बेअरफूट पार्क, हॅमॉक गार्डन, बर्मा ब्रिज, ड्यू गार्डन, फर पार्क आणि बरेच काही समाविष्ट आहे. महिंद्रा नेस्टॅल्जिया येथील घरे कोई तलाव,  ८ आकारातील फूट ची, गपशप अड्डा, रेन बेंचेस आणि एल्डर्स पार्कलेटसह हिरव्यागार पसरलेल्या जागेत रहिवाशांना प्रकल्पाच्या सुरक्षित परिघात निसर्गाचा आनंद लुटता येईल.

महिंद्रा लाइफस्पेस डेव्हलपर्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद सुब्रमण्यन म्हणाले, ” आमच्यासाठी महत्वाच्या आणि मुख्य भर असलेल्या बाजारपेठापैकी एक असलेल्या पुण्यात आम्ही आमचे स्थान मजबूत करत असताना शहरातील पहिला बायोफिलिया-प्रेरित निवासी प्रकल्प सादर करण्यास आम्ही खूप उत्सुक आहोत. महिंद्रा नेस्टॅल्जिया हा आमचा पुण्यातील दहावा प्रकल्प आहे. पुणे हे एक असे शहर आहे जिथे थोडी उसंत आहे, निवांतपणा आहे आणि या शहराने पुन्हा पुन्हा आमच्या नाविन्यपूर्ण सादरीकरणासाठी जोरदार मागणी केली आहे.

कुटुंबाच्या सर्वांगीण स्वास्थ्यात घर आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर याबाबतची भूमिका अनेकदा दुर्लक्षित झालेली असते. आपण आपल्या वाढत्या वयातील दिवसांपासूनच्या गोष्टी प्रेमाने लक्षात ठेवलेल्या असतात. यातूनच महिंद्रा नेस्टॅल्जिया जगण्याचे सार परत आणते. यातील अनेक गोष्टींचा संबंध निसर्गाशी आहे. हा प्रकल्प पुणेकरांना झपाट्याने विकसित होणाऱ्या शहराच्या सोयीसुविधांचा आनंद घेत निसर्गाच्या सानिध्यात राहण्याची संधी देईल.”

महिंद्रा लाइफस्पेसेसच्या पर्यावरणास अनुकूल घरे तयार करण्याच्या वचनबद्धतेनुसार, महिंद्रा नेस्टॅल्जियाला IGBC द्वारे ‘गोल्ड’ रेटिंगसह पूर्व-प्रमाणित करण्यात आले आहे. हा प्रकल्प रहिवाशांना लो-फ्लो वॉटर फिक्स्चर, सोलर वॉटर हीटर, सामाईक भागात एलईडी लाइटिंग, कचरा विलगीकरण इत्यादींद्वारे मूर्त बचत सुविधा प्रदान करतो. प्रकल्पातील शाश्वत वैशिष्ट्ये वार्षिक ७% पर्यंत ऊर्जेचे संरक्षण करण्यास, बाह्य पाण्यावरील अवलंबित्व ५२ % नी कमी करण्यास आणि ९०% कचरा लँडफिलमधून वळवण्यास मदत करतील.

महिंद्रा लाइफस्पेसेसने मार्च २०२२ मध्ये अधिग्रहित केलेल्या २.७९-एकर जागेवर महिंद्रा नेस्टॅल्जिया विकसित केले आहे. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात २४९ युनिट्सचा समावेश आहे. 2 आणि 3 BHK घरे ७३० चौरस फूट ते १०४० चौरस फूट पर्यंत आहेत. महिंद्रा नेस्टॅल्जियाचे हवामान-प्रतिसादक डिझाइन घरांमध्ये इष्टतम सूर्यप्रकाश, ताजी हवा अभिसरण आणि शेजारच्या शांत लँडस्केपसाठी खुले असल्याचे सुनिश्चित करते. येथे विचारपूर्वक तयार केलेली भव्य लॉबी, मुलांच्या खेळण्यासाठी पूलसह स्विमिंग पूल, क्रिशे आणि हेल्थ क्लबसाठी जागा, सेलिब्रेशन हॉल, ड्राय पॅन्ट्री, सिनेमा लाउंज, रीडर्स बे आणि इलेक्ट्रिक वाहने चार्ज करण्याची तरतूद यासारखी आधुनिक वैशिष्ट्ये देखील आहेत.

Leave a Reply

%d bloggers like this: