पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख कोरोना पॉझिटिव्ह
पुणे : पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या ते डॉक्टरांच्या सल्ल्याने घरीच कोरंटाईन झाले असून उपचार घेत आहेत.
करोनाचा प्रसार सुरू झाल्यापासून डॉ. राजेश देशमुख यांनी करोनाचा विळखा मोडून काढण्यासाठी प्रयत्न केले आहेत. योग्य नियोजन आणि त्याची अंमलबजावणी यामुळे पुणे शहरात करोना रुग्णांची संख्या कमी झाली होती. मात्र, आता रुग्ण परत वाढत असल्याने डॉ. राजेश देशमुख यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी संपर्कात आलेले माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही कोरोंनाची लागण झाली होती.
