Wednesday, June 17, 2026
Latest NewsPUNE

तुळशीबागेत डॉक्टर आणि सीए यांचा विशेष सन्मान

पुणे : आपल्या आयुष्यात डॉक्टरांची भूमिका ही अत्यंत महत्वाची असून त्याचे महत्व पटवून देण्यासाठी डॉक्टर्स डे आणि सीए डे निमित्त डॉक्टर व सीए यांचा सन्मान तुळशीबाग गणपती मंदिरासमोर करण्यात आला. डॉक्टरी पेशा द्वारे समाजासाठी महत्त्वाची भूमिका बजावत असताना समाजाच्या तळागाळातील लोकांसाठी मनापासून काम करणाऱ्या डॉक्टरांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला.

मानाचा चौथा गणपती श्री तुळशीबाग सार्वजनिक गणपती मंडळ, श्री तुळशीबाग पतसंस्था, तुळशीबाग व्यापारी असोसिएशन आणि लायन्स क्लब ऑफ पूना शिवाजीनगरच्यावतीने डॉक्टर आणि सीए यांच्या सन्मानसोहळ्याचे आयोजन तुळशीबागेत करण्यात आले होते. यावेळी तुळशीबाग मंडळाचे अध्यक्ष विकास पवार, संजय मुनोत, श्री देव, नितीन पंडित, लायन्स क्लब ऑफ पुणे शिवाजी नगरचे अध्यक्ष जीवन हेंद्रे आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ. अनिल तोष्णीवाल, डॉ. ज्योती तोष्णीवाल, डॉ.संजीव खुर्द, डॉ.साधना खुर्द, डॉ.अभिजीत सोनावणे, डॉ. मनिषा सोनावणे, डॉ. सदानंद राऊत, डॉ.पल्लवी राऊत, डॉ.शेखर कुलकर्णी, डॉ.अंजली करी, डॉ.कीर्ती नांदेडकर, डॉ.अभिजीत फडणीस यांसह सीए स्वप्निल बचुटे, सुरेश मेहता, चंद्रशेखर लुणीया, नारायण सारडा यांना गौरविण्यात आले.

जीवन हेंद्रे म्हणाले, केवळ वैद्यकीय पेशा म्हणून नाही, तर सामाजिक बांधिलकी म्हणून अनेक डॉक्टर्स काम करीत असतात. सामान्य नागरिकांपासून ते भिक्षेक-यांसाठी कार्य करणा-या डॉक्टरांचा सन्मान आज करण्यात आला. लायन्स क्लबच्या माध्यमातून असे अनेक उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

नितीन पंडित म्हणाले, डॉक्टर हा समाजाचा अविभाज्य घटक आहेत. हिंदू संस्कृतीत डॉक्टरांना माणसातील देव मानले जाते. याचा प्रत्यय कोरोना काळात आपल्या सर्वांना आला. त्यामुळेच समाजात उल्लेखनीय काम करणाऱ्या डॉक्टर आणि सीए यांचा सन्मान मंडळाच्या वतीने करण्यात आला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading