महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्तीमागे कोणतेही राजकारण नाही -शरद पवार
पुणे : भारतीय कुस्तीगीर संघाने, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद बरखास्त केली आहे. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष हे स्वतः शरद पवार आहेत, त्यामुळे शरद पवार यांना हा एक मोठा धक्का समजला जात आहे. देशातील, राज्यातील अनेक क्रीडा संघटनांचा अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे मी कायम अशा संघटनांच्या कामांचे दोन भाग करतो. एक भाग खेळ, खेळाडूंबाबत आणि दुसरा भाग क्रीडा संस्थेच्या प्रशासनाबाबत. परंतु मी त्यांच्या अंतर्गत गोष्टीत कोणत्याही प्रकाराचा हस्तक्षेप केला नाही.महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्तीमागे कोणतेही राजकारण नाही. अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शरद पवार म्हणाले, महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचा मी अध्यक्ष आहे. राष्ट्रीय, राज्य स्पर्धांचे आयोजन करणे हे माझे काम आहे. मी त्यांच्या प्रश्नांसाठी परिषदेवर गेलो होते. क्रीडा संघटनांना मैदान मिळणे कठीण असते. त्यामुळे क्रीडा क्षेत्राला खासगी किंवा सरकारी मदत मिळवून देणे हे माझे आहे. मी कधीही अंतर्गत गोष्टींमध्ये हस्तक्षेप केला नाही.
राहुल आवारे, अभिजीत कटके, उत्कर्ष काळे, किरण भगत यांना मी मदत केली. अनेक खेळाडूंना वैद्यकिय किंवा आर्थिक मदत मी केली आहे. आयुष्यात मी पहिल्यांदा खेळाडूंना जाहीर केलेल्या मदतीबाबत सांगितले आहे. कोणत्याही राज्यातील कुस्तीगीर परिषदेबाबात तक्रारी असतील तर त्याबाबत निर्णय घेणे राष्ट्रीय कुस्तीगीर संघटनेला टाळता येत नाही. या कारवाईच्या आधी महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेला कोणतीही पूर्वसूचना किंवा स्पष्टीकरण मागण्यात आले नव्हते. पण मी त्याच्या खोलात मी जाऊ इच्छित नाही. या परिस्थितून मार्ग काढण्यासाठी रामदास तडस आणि काका पवार यांच्यासोबत एकत्र येऊन बैठक घेणार असल्याचे देखील पवार म्हणाले,
अर्थ सहाय्यावर भाष्य करताना पवार म्हणाले, काही खेळाडूंना शिष्यवृत्ती हवी असते. माझं काम हे आहे खेळाडूंना मदत करणं आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशन मैदान घेतलं, तिकडे चांगलं ट्रेनिंग होतं. खेळाडूंना निवृत्तीनंतर त्यांना हातभार लावला जातो. काही खेळाडू राज्य, देश, जागतिक पातळीवर चमकत आहेत. या खेळाडूंना मदत करणं माझं काम आहे. मी कुस्तीगीरांना मदत केली. राहुल आवारे, उत्कर्ष काळे, अभिजीत कटके यांच्यात पुढे जाण्याची धमक आहे. या खेळाडूंना प्रशिक्षण आणि खुराक यासाठी प्रत्येकी १२ लाख रुपये दिले आहेत’, असेही पवारांनी सांगितले.
