राज्यपालांनी पेढा भरवल्याचे मी कधी पाहिले नाही किंवा मी स्वतःही कधी पेढा खाल्ला नाही – शरद पवार
पुणे: बारा जणांच्या आमदारांच्या नियुक्तींचा वाद अजूनही प्रलंबित आहे. महाविकास आघाडी सरकार कोसळले तरीया नियुक्ती कधी होतात याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे. त्यावर आमची बारा जणांची आमदारकीसाठीची यादी राज्यपालांनी मंजुर केली नाही. पण आता नव्या सरकारकडून यादी दिली जाईल आणि ती राज्यपाल मंजूर करतील.
राज्यपाल पदावर येताना ते निरपेक्ष पद्धतीनं काम करण्याची शपथ घेतात. आताचे राज्यपाल निरपेक्ष पद्धतीच्या कामाची नवी व्याख्या देशासमोर ठेवतील. मी पदग्रहणाच्या अनेक शपथा पाहिल्या किंवा स्वतःही अनेक शपथा घेतल्या. पण राज्यपालांनी पेढा भरवल्याचे मी कधी पाहिले नाही किंवा मी स्वतःही कधी पेढा खाल्ला नाही.अशी टीका राज्यपालांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यातील पत्रकार परिषदे त केली.
विधिमंडळात शिवसेनेच्या बंडखोर आमदारांची जी संख्या आहे ते पाहता न्यायालयाचा निकाल काय येईल हे सांगता येत नाही. सभागृहात गेल्यावर हे सगळे विचारवंत
काय करतील हे सांगता येत नाही. काही जण म्हणतात की सभागृहात गेल्यावर त्यांचे मतपरिवर्तन होईल. पण मला माहित नाही. सर्वोच्च न्यायालयाची कालची कमेंट गंभीर. गृह मंत्रालयाला जाब विचारण्यात आलाय. असे शरद पवार म्हणाले.
मागीलवेळी मुख्यमंत्री झाल्यावर फडणवीसांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे अनेक नेते फोडले होते या प्रश्नावर बोलताना शरद पवार म्हणाले की, ‘फडणवीस नव्या पद्धतीने लोकप्रतिनिधींना स्वतःकडे घेतायत. याबाबत आम्हाला काळजी घ्यावी लागेल.’ आमच्यावर हाय कमांडच्या नावाने त्यावेळेस भाजपकडून जी टिका वाहायची. तीच आता भाजपवर होतेय. म्हणजे आमची कार्यपद्धती योग्य होती हे सिद्ध होतय.असेही शरद पवार म्हणाले.
राज्यात शिवसेना विरुद्ध शिंदेंसेना वाद सुरू आहे आज सकाळी उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना व्हीप दिला आहे. त्यामुळे भरपूर आमदार अडचणीत येऊ शकतात. त्यावर विविध नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.पक्षाचा व्हीप हा आमदारांना पाळावा लागतो. पक्ष म्हणजे विधिमंडळ पक्ष आणि पक्ष संघटना आहेत. त्यामुळे कोर्टात कुठल्या पॉलिसी धरण्यात येऊ शकतो. असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.
