Thursday, June 18, 2026
Latest NewsPUNE

शैक्षणिक शुल्क वाढ व PhD शुल्कवाढ मागे घ्या, अन्यथा आंदोलन- अभाविप

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरातील विविध शैक्षणिक विभागातील शुल्क वाढ लागू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. २०२०-२१ शैक्षणिक वर्षात ही शुल्कवाढ आकारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सदर शुल्कवाढ ही अवाजवी असून विद्यार्थ्यांना परवडणारी नाही. संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुद्धा कोर्सवर्क फीस व अन्य शुल्कात वाढ झाली आहे. विद्यापीठ परिसरात ग्रामीण भागातून शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठया प्रमाणात आहे. कोरोना काळानंतरची ग्रामीण भागातील आर्थिक परिस्थिती अजूनही बिकट असून विद्यार्थ्यांना शुल्काचा आर्थिक भार सहन करणे शक्य नाही. या सर्व बाबींचा विचार करून सदर शुल्कवाढ मागे घेऊन विद्यार्थी हिताचा तत्काळ निर्णय घ्यावा अशी मागणी अभाविप कडून करण्यात आली आहे. शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी सदर शुल्कवाढ प्रस्तावित होती मात्र कोविड मुळे शुल्क वाढ स्थगित करण्यात आली होती, आता यावर कमिटी स्थापन करण्यात आली असून विद्यार्थी हिताचा निर्णय घेण्यात येईल असे प्र-कुलगुरूंनी अभाविप शिष्टमंडळाला सांगितले.
मागणी मान्य न झाल्यास अभाविप आक्रमक आंदोलन करेल व शुल्कवाढ मागे घेण्यास भाग पाडेल, असा इशारा पुणे महानगर मंत्री शुभंकर बाचल यांनी दिला आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading