Friday, October 23, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

रिक्षावाला ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा प्रवास

मुंबई : एखाद्या सस्पेंस, थ्रिलर चित्रपटाला शोभेल अशा नाट्यमय घडामोडी काल रात्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला. या घटनेचा क्लायमॅक्स आज उघड झाला. अन् महाराष्ट्रातील राजकारणात भूकंप घडवणारे शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले. अनेक वर्ष शिवसेनेचे कट्टर समर्थक असलेल्या एकनाथ शिंदेची वाटचाल रिक्षावाला ते मुख्यमंत्री व्हाया महाविकास आघाडीतील नगरविकास मंत्री अशी आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘धर्मवीर’ चित्रपटात त्यांच्या वाटचालीवर प्रकाश टाकण्यात आला.

एकनाथ शिंदे हे मुळचे महाराष्ट्रातील सातारा येथील जावळी तालुक्यातील असून ते मराठा समाजाचे नेतृत्व करतात. त्यांचा जन्म 9 फेब्रुवारी 1964 चा. त्यांचे कुटुंब उदरनिर्वाहासाठी मुंबईच्या बाहेरील भागात ठाण्यात वास्तव्यास आले आणि तेथेच स्थायीक झाले. एकनाथन शिंदे यांचे  शिक्षण मंगला हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज, ठाणे येथे झालेले आहे. सुरवातीच्या काळात आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी शिंदे ऑटोरिक्षा चालवत असत.

त्यानंतर शिवसेना नेते आनंद दिघे यांनी त्यांना राजकारणात आणले. शिवसेना कार्यकर्ते पासून सुरू झालेला त्यांचा प्रवास नगरसेवक, जिल्हा प्रमुख, आमदार, नगरविकास मंत्री आणि आता मुख्यमंत्री असा प्रवास झाला आहे. जवळपास 16 वर्ष एकनाथ शिंदे यांनी ठाण्याचे जिल्हा प्रमुख म्हणून काम पाहिले आहे. त्यांच्या पत्नी मीनाक्षी शिंदे या ठाण्याच्या माजी महापौर आहेत. तर शिंदे यांचे पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे हे ऑर्थोपेडिक सर्जन आहेत. तसेच ते 2014 पासून शिवसेनेच्या तिकिटावर कल्याण मतदारसंघातून लोकसभेसाठी निवडून आलेले खासदार आहेत.  

सन 2000 मध्ये शिंदे यांची मुले दिपेश (वय 11) आणि शुभदा (वय 7) महाराष्ट्रातील त्यांच्या मूळ गावाजवळील तलावात बोटिंगसाठी गेले होते. त्यावेळी बोट उलटली आणि शिंदे यांच्या दोन्ही मुलांचा बुडून मृत्यू झाला. शिंदे अनेक महिने नैराश्यात गेले होते. त्यावेळी शिवसेना नेते आनंद दिघे यांनी शिंदे यांना भावनिक आधार दिला आणि त्यांना पुन्हा राजकारणात सक्रीय केले.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading