Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

स्वरमल्हारमधून मिळणार सांगीतिक मेजवानी ; रंगणार व्हायोलीन विशेष कार्यक्रम

२ आणि ३ जुलै रोजी गणेश कला क्रीडा रंगमंच येथे आयोजन

पुणे : व्हायोलिन अकॅडमी आणि ऑर्लीकॉन बाल्झर्स यांच्या संयुक्त विद्यमाने २ व  ३  जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता गणेश कला क्रीडा रंगमंच येथे सातव्या ‘स्वरमल्हार’ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.  या कार्यक्रमात रसिकांना गायन आणि वादन याबरोबरच व्हायोलीन विशेष कार्यक्रमांचा आस्वाद घेता येणार आहे.

कार्यक्रमाची सुरवात २ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता संगीता शंकर आणि त्यांच्या दोन कन्या नंदिनी व रागिणी यांच्या व्हायोलीन वादनाने होणार आहे. त्यानंतर उस्ताद शुजात हुसैन यांचे सितारवादन होईल. पहिल्या दिवसाचा शेवट दीपक पंडीत यांच्या ‘सिंफनी ऑफ व्हायोलीन’ या कार्यक्रमाने होईल.  कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवसाची सुरवात (३ जुलै) तेजस आणि राजस उपाध्ये यांच्या व्हायोलीन वादनाने होईल. त्यानंतर राहुल देशपांडे यांचे गायन होईल. व्हायोलीन अकॅडमीच्या कलाकारांतर्फे सादर होणाऱ्या ऑर्केस्ट्राने स्वरामल्हार या महोत्सवाची सांगता होणार आहे. या प्रमुख कलाकारांना साथीला असणाऱ्या कलाकारांमध्ये मुकेश जाधव, ईशान घोष, अजिंक्य जोशी, चैतन्य कुंटे आदी कलाकारांचा समावेश आहे.

या कार्यक्रमासाठी  बढेकर ग्रुप, विलास जावडेकर डेव्हलपर्स आणि चंदूकाका सराफ यांचे सहकार्य लाभले असून रसिकांसाठी हा कार्यक्रम सशुल्क आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading