Sunday, April 5, 2026
Latest NewsPUNE

पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सर्व सुट्ट्या १२ जुलैपर्यंत रद्द

पुणे : राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं गढूळ झालं आहे. दिवसेंदिवस अनेक राजकीय बदल घडत आहेत. दरम्यान, या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस महासंचालकांनी निर्णय घेतला आहे. राज्यातील राजकीय परिस्थितीमुळे पुणे पोलिसांना अलर्ट जारी करण्यात आला आहे. पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सर्व सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. १२ जुलैपर्यंत वैद्यकीय सुट्टी वगळता इतर सुट्ट्या केल्या रद्द करण्यात आल्या आहेत. राजकीय परिस्थितीमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे पुण्यात पोलिसांना २८ जून ते १२ जुलैपर्यंत ऑन ड्युटी रहावं लागणार आहे. सध्या राज्यात सुरु असलेल्या राजकीय वातावरणाची पार्श्वभूमी पाहता हा निर्णय घेण्यात आल्याते पुणे पोलिस दलाने स्पष्ट केलं आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading