fbpx

संभाजी ब्रिगेडच्या वतीने राजर्षी शाहू महाराज जन्मदिन लोकराज्य दिन म्हणून साजरा.

 

पुणे:संभाजी ब्रिगेड पुणे जिल्ह्याच्या वतीने छत्रपती राजर्षी शाहू महाराज जन्मदिन लोकराज्य दिन म्हणून साजरा करण्यात आला, माहेर संस्था ( अनाथालय ) आव्हाळवाडी येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज जन्मोत्सव मोठया उत्साहात साजरा करण्यात आला, यावेळी प्रसिद्ध व्याख्याते शेखर पाटील यांचे व्याख्यान झाले, तसेच राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त संभाजी ब्रिगेड पुणे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे व इतर पदाधिकाऱ्यांच्या हस्ते मुलांना व ज्येष्ठ नागरिकांना फळ व जिलेबीचे वाटप करण्यात आले,

संभाजी ब्रिगेड पुणे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले,
यावेळी जिल्हा सचिव निलेश ढगे, सोशल मिडिया जिल्हाध्यक्ष सोनु शेलार, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष जयदीप रणदिवे, व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष विवेक कावरे, वाहतूक आघाडी उपाध्यक्ष विजय कदम, जिल्हा सह संघटक किशन झेंडे, विठ्ठल सुर्यवंशी, संदीप मोरे, माहेर संस्थेचे कर्मचारी, पी एस आय पवार साहेब, व त्यांचे सहकारी पोलीस बांधव उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: