fbpx
Thursday, April 25, 2024
ENTERTAINMENTLatest News

क्रांती रेडकरच्या ‘रेनबो’च्या चित्रीकरणाचा लंडनमध्ये श्रीगणेशा

काही महिन्यांपूर्वी ‘प्लॅनेट मराठी’ आणि ‘हाय आयक्यू’ यांच्या सहयोगाने ‘मँगोरेंज प्रॉडक्शन’ निर्मित ‘रेनबो’ या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. नुकतेच या चित्रपटाचे लंडनमध्ये चित्रीकरण सुरु झाले असून लवकरच हा चित्रपट रंगांची उधळण घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येईल. या चित्रपटात शरद केळकर, सोनाली कुलकर्णी, उर्मिला कोठारे आणि ऋषी सक्सेना यांच्या प्रमुख भूमिका आहते. ‘रेनबो’ म्हणजे अनेक रंगांचे प्रतीक आणि त्यामुळेच या चित्रपटात देखील आपल्याला विविध रंग पाहायला मिळणार आहेत. आजच्या काळात नात्यांमध्ये येणाऱ्या विविध रंगांचा प्रवास यात पाहायला मिळणार आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील नावाजलेल्या कलाकारांचा मिळून हा ‘रेनबो’ तयार होत असल्याने हे सर्व रंग एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षक देखील उत्सुक आहेत.

दिग्दर्शिका क्रांती रेडकर म्हणते, ” ‘रेनबो’ हे नावच कलरफुल आहे. या नावातच सारे रंग भरलेले आहेत. नात्यातील हाच सप्तरंगी प्रवास या चित्रपटाच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या चित्रपटाच्यानिमित्ताने अक्षय बर्दापूरकर यांच्या ‘प्लॅनेट मराठी’ चा भाग होण्याची संधी मला मिळाली. इतक्या दिवसांची प्रतीक्षा अखेर संपली असून आता चित्रीकरणाचा श्रीगणेशा झाला आहे.”

या चित्रपटाविषयी ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, “क्रांती रेडकर ही अतिशय उत्तम अभिनेत्री तर आहेच याशिवाय तिचे दिग्दर्शन देखील कमाल आहे. ‘रेनबो’ हा असा चित्रपट आहे, जो नात्यातील काही संवेदनशील गोष्टी समोर आणणार आहे. या चित्रपटाची कथा मनाला भावणारी आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल.”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading