Wednesday, June 3, 2026
Latest NewsPUNE

करुणा शर्मा यांना १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी

पुणे: सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणाऱ्या करुणा शर्मा यांच्यावर अॅट्रोसिटीचा गुन्हा करण्यात आला होता. या प्रकरणी येरवड्यातील महिलेने फिर्याद दिली होती.
पुण्यातील येरवडा पोलिसात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
एका महिलेचा पती व करुणा शर्मा यांनी शस्त्राचा धाक दाखवून जातीवाचक शिवीगाळ करणे, अपहरण करुन पतीसोबत घटस्फोटासाठी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप एका महिलेने केला होता. या प्रकरणी पुण्यातील येरवडा पोलिसात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
एका महिलेचा पती व करुणा शर्मा यांनी शस्त्राचा धाक दाखवून जातीवाचक शिवीगाळ करणे, अपहरण करुन पतीसोबत घटस्फोटासाठी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप एका महिलेने केला होता. या प्रकरणी आज पोलिसांनी सकाळी करुणा शर्मा यांना अटक केली आहे त्यानंतर आज करुणा शर्मा यांना पुणे कोर्टात सुनावणीसाठी हजर करण्यात आले. त्यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे अशी माहिती फिर्यादीचे वकील विजयसिंह पाटील यांनी दिली.
विजयसिंह पाटील म्हणाले, करुणा शर्मा यांना तोपर्यंत येरवडा कारागृहात ठेवणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading