Wednesday, June 3, 2026
Latest NewsPUNE

डीईएसमध्ये योगदिन साजरा

पुणे  : डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या (डीईएस) विविध घटक संस्थांमध्ये जागतिक योगदिनानिमित्त योगासने, सूर्यनमस्कार व प्राणायामाची प्रात्यक्षिके, व्याख्याने आदी कार्यक्रमांचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले होते. नवीन मराठी शाळेत मनाचे आणि शरीराचे आरोग्य जपण्यासाठी योगासने करा असे आवाहन मुख्याध्यापिका कल्पना वाघ यांनी केले.

विद्यार्थ्यांबरोबर पालकांनी प्रात्यक्षिकांमध्ये सहभाग घेतला. बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयात (बीएमसीसी) प्राचार्या डॉ. सीमा पुरोहित यांच्या मार्गदर्शनाखाली प्रात्यक्षिके करण्यात आली. डीर्इएस प्रायमरी, सेकंडरी आणि एनर्इएमएस स्कूलमध्ये प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते. मा. स. गोळवलकर गुरुजी विद्यालयात ‘ब्रेन योगा’ सादर करण्यात आला. योग गुरु संगीता मणियार यांनी योगासने करून घेतली. आयुष मांडवे या विद्यार्थ्याने ‘लिफ आर्ट’ झाडांच्या पानावर योगासनाच्या प्रात्यक्षिकांची चित्रे साकारली. रानडे बालक मंदिरात योगशिक्षिका शिल्पा पराडकर यांनी सूर्यनमस्कार, ताडासन, वृक्षासन, उत्कटासन, भुजंगासन, पद्मासन, पश्चिमोत्तानासन ही आसने करून घेतली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading