Thursday, June 18, 2026
Latest NewsSports

एमएसएलटीए अखिल महाराष्ट्र आंतरक्लब टेनिस स्पर्धेत पीवायसी अ, नाशिक जिल्हा, मुंबई उपनगर जिल्हा संघटना संघांचा सलग दुसरा विजय

मुंबई, 18 जून 2022: महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए) यांच्या वतीने आयोजित पाचव्या एमएसएलटीए अखिल महाराष्ट्र आंतरक्लब टेनिस स्पर्धेत साखळी फेरीत पीवायसी अ, नाशिक जिल्हा, मुंबई उपनगर जिल्हा संघटना या संघांनी विजयी मालिका कायम ठेवत सलग दुसरा विजय मिळवला.

एसएसके क्लब, नाशिक येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत गटसाखळी फेरीत अ गटात पीवायसी अ संघाने जिल्हा ब संघाचा 32-08 असा पराभव करून विजय मिळवला. पीवायसी अ संघाकडून राधिका कानिटकर, जयंत कढे, केदार शहा, हिमांशु गोसावी, ऋतुपर्णा कुलकर्णी, अनुप मिंडा, केतन धुमाळ, अभिषेक ताम्हाणे यांनी सुरेख कामगिरी बजावली.  दुसऱ्या सामन्यात मुंबई उपनगर जिल्हा संघटना संघाने पीवायसी क संघाचा 32-13 असा पराभव करून आपली विजयी मालिका कायम ठेवली. विजयी संघाकडून अभिजित मुजुमदार, रामा राव, दिनेश लावुगिरी, हिरोशी टेकाय  मायकाई सबाई, निशित पांडे, करण डॉक्टर, राहुल यांनी अफलातून कामगिरी केली.

तिसऱ्या ब गटाच्या सामन्यात धर्मेंद्र शर्मा, निखिल संपत, विक्रम संपत, इंतिकाब अली, इम्रान युसूफ, लव कोठारी यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर सीसीआय अ संघाने पीवायसी ब संघाचा 25-20 असा पराभव करून विजयी सलामी दिली. नाशिक जिल्हा संघाने खार जिमखाना संघाचा 25-23 असा संघर्षपूर्ण पराभव केला.

निकाल: गटसाखळी फेरी:

गट अ: पीवायसी अ वि.वि.जिल्हा(डिस्ट्रिक्ट) ब 32-08(110 अधिक गट: राधिका कानिटकर/जयंत कढे वि.वि.अक्सन खान/मिर्झा मसूद 8-4; 100 अधिक गट: केदार शहा/हिमांशु गोसावी वि.वि.अनुज शहा/राहुल शर्मा 8-1; 90 अधिक गट: ऋतुपर्णा कुलकर्णी/अनुप मिंडा  वि.वि.विकास आसवानी/संजय चांदवानी 8-1; खुला दुहेरी गट: केतन धुमाळ/अभिषेक ताम्हाणे वि.वि.रूपेश रॉय/मनीष सूर्यवंशी 8-2);

 
गट अ: मुंबई उपनगर जिल्हा संघटना वि.वि.पीवायसी क 32-13(110 अधिक गट: अभिजित मुजुमदार/रामा राव  वि.वि.हनिफ मेमन/कौस्तुभ शहा 8-2; 100 अधिक गट: दिनेश  लावुगिरी/मायकाई सबाई वि.वि.राजू कांगो/ध्रुव मैड 8-6;  90 अधिक गट: हिरोशी टेकाय/निशित पांडे वि.वि. श्रवण हार्डीकर/पराग चोपडा 8-2; खुला दुहेरी गट: करण डॉक्टर/राहुल वि.वि.रघुनंदन/रोहन दळवी 8-3);
 

गट ब: सीसीआय अ  वि.वि.पीवायसी ब 25-20(110 अधिक गट: धर्मेंद्र शर्मा/निखिल संपत वि.वि.अमित नाटेकर/प्रशांत गोसावी 8-5; 100 अधिक गट: विक्रम संपत/इंतिकाब अली वि.वि.सुंदर अय्यर/योगेश पंतसचिव 8-0; 90 अधिक गट: इम्रान युसूफ/लव कोठारी  वि.वि.अमित लाटे/पराग नाटेकर 8-7; खुला दुहेरी गट: प्रसाद प्रधान/संजय खांडवे पराभूत वि.नरहर गर्गे/रोहित शिंदे 1-8;

 
गट ब: नाशिक जिल्हा वि.वि. खार जिमखाना 25-23(110 अधिक गट: श्रीकांत पारेख/किरण कुलकर्णी वि.वि.भूषण अकुत/किशोर सबनानी 8-1; 100 अधिक गट: ताटी  गुजराथी/शिरीष नांदुर्डीकर वि.वि.गौरव कपाडिया/राहुल गोरे 8-6; 90 अधिक गट:  अद्वैत आगाशे/दिलीप लोंढे पराभूत वि.वर्धन शहा/अमित तांबे 2-8; खुला दुहेरी गट: श्रीकांत कुमावत/गौरव देशपांडे पराभूत वि.अमन कोहली/स्वप्नील अकुत 7-8).

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading