धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा शर्मा यांच्यावर अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल
पुणे : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणाऱ्या करुणा शर्मा यांच्यावर पुण्यात येरवडा पोलिस ठाण्यात अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी येरवडातील महिलेने फिर्याद दिली. फिर्यादीत म्हटले आहे, की तिचा पती व करुणा शर्मा हिच्यावर शस्त्राचा धाक दाखवून जातीवाचक शिवीगाळ करणे, अपहरण करुन पतीसोबत घटस्फोटासाठी जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व तिचा पती हे उस्मानाबादला राहत होते. नोव्हेंबर २०११ मध्ये त्यांच्या पतीची ओळख करुणा शर्माबरोबर झाली. ती आपली ओळख करुणा मुंडे असे करुन देत. फिर्यादीचा पती वारंवार करुणा शर्माच्या घरी राहू लागला. त्यानंतर फिर्यादी व त्यांचा पती पुण्यात येऊन स्थायिक झाले. पती हा शर्माची वारंवार बोलत होता. १६ फेब्रूवारी २०२२ रोजी कार्यक्रमाला जायचे म्हणून पतीने फिर्यादीला भोसरी येथे नेले.
येते करुणा शर्मा हिने हाॅकीस्टीकचा धाक दाखवत जातीवाचक शिवीगाळ केली फिर्यादीला जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस आयुक्त किशोर जाधव हे करित आहेत.
