आठवा रंग प्रेमाचा …रसिंकांसाठी
प्रेमाला किती रंग असतात. याचे उत्तर जरी अनुत्तरीत असले तरी प्रेमाला आठवा रंग असतो, हे नुकताच प्रदर्शित झालेल्या आठवा रंग प्रेमाचा या चित्रपटाने दाखवून दिले. या चित्रपटात सैराट फेम रिंकू राजगुरु , मकरंद देशपांडे आणि कांचन जाधव यांच्या प्रमुख भूमिका आहेत. यांतील अभिनेत्री कांचन जाधव हिने आपल्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांना चित्रपटाच्या प्रिमिअर शोची भेट दिली. यावेळी चित्रपटाचे निर्माते समीर कर्णिक, आणि लेखिका व दिग्दर्शिका खुशबू सिन्हा यावेळी कांचन जाधव यांच्यासमवेत उपस्थित होत्या. ॲसिड ॲटॅक सारखा ज्वलंत प्रश्न या सिनेमातून हाताळला गेला आहे. प्रेम हे केवळ दाखवण्यासाठी नाही.जेव्हा जीवाभावाचा सखा दगाबाजी करतो, तेव्हा दुखऱ्या प्रेमाचा रंग हा आठवा असतो. हेच या सिनेमातून दाखवण्यात आलें. यावेळी बोलताना अभिनेत्री कांचन जाधव यांनी सांगितले की हा सिनेमा माझ्या वाढदिवसानिमित्ताने मिळालेली मौल्यवान भेट असून यामुळे माझा आत्मविश्वास द्विगुणीत झाला आहे. यावेळी रसिक प्रेक्षकांनी आपली मते व्यक्त करुन उत्तम चित्रपट असल्याची पावती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गिझाली राऊत यांनी केले.
