Wednesday, June 3, 2026
Latest NewsPUNE

झांशीची राणी लक्ष्मीबाई यांना अभिवादन

पुणे : झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या पुण्यतिथीनिमित्त बालगंधर्व चौकात राणी लक्ष्मीबाई यांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ अहिल्यादेवी शाळा आणि मा. स. गोळवलकर गुरुजी प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी अभिवादन केले.

ढोल-ताशाच्या गजरात गोळवलकर गुरजी प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी मानवंदना दिली. मेरी झांसी नहीं दूंगी, खूब लड़ी मर्दानी वो तो झांसीवाली रानी थी, वंदे मातरम, भारत माता की जय अशा घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले.

स्वरा अपामार्जने या विद्यार्थिनींने पोवाड्याचे गायन केले. हिरण्याक्षी पवार हिने लक्ष्मीबाईंची चरित्रकथा, पराक्रम कथन केला. गाथा राऊत या विद्यार्थिनीने झाशीच्या राणीची वेशभूषा केली होती.

अहिल्यादेवीच्या पर्यवेक्षिका चारुता प्रभुदेसाई, शिक्षिका दीपाली थोरात, डॉ. सुलोचना शिंदे-माने, सुभाष निंबाळकर, प्रशांत जाधव यांनी संयोजन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading