Wednesday, June 3, 2026
Latest NewsMAHARASHTRANATIONALPUNETOP NEWS

अग्निपथ योजना देश हिताचीच -लेफ्टनंट जनरल (नि) राजेंद्र निंभोरकर

पुणे : अग्निपथ योजना देश हिताचीच आहे त्यामुळे तरुण देशसेवे कडे प्रेरित होतील असे प्रतिपादन लेफ्टनंट जनरल (नि)राजेंद्र निंभोरकर यांनी पत्रकार परिषदेत केले.

या वेळी शहर सरचिटणीस राजेश येनपुरे ,नारायण विश्वास ,धनंजय जाधव ,पुष्कर तुळजापूरकर आदी उपस्थित होते. अग्निपथ योजना नक्की काय आहे या विषयावर भारतीय जनता पार्टी पुणे शहर कार्यलयात पत्रकार परिषद आयोजित केली होती. 

या वेळी बोलताना निंभोरकर म्हणाले की सैन्यभरतीच्या प्रक्रियेत कुठेही हस्तक्षेप या योजनेमध्ये होणार नाही केंद्र सरकार ने वयोमर्यादा १७.५ते २३अशी केली आहे ज्यामध्ये ४वर्ष लष्कर सेवा केल्यानंतर २५%उमेदवार निवडले जातील उरलेले जे उमेदवार केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात किंवा अन्य सेवेत त्यांना प्राधान्य असेल
राज्य सरकारांनी सुद्धा या अग्निवीरांच्या साठी पोलीस भरती किंवा इतर क्षेत्रा मध्ये आरक्षण जाहीर केले तर ते जास्त उपायुक्त ठरेल या मध्ये राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर भाष्य करताना ते म्हणाले की गोपनीयता ही तुमच्या मानसिकतेवर अवलंबून असते प्रत्येक क्षेत्रात गोपनीयता असतेच मग कोणीही नोकरीत बदल केला तर आधीच्या ठिकाणची गोपनीयता भंग करत नाही तर लष्करी सेवेवर आक्षेप घेतला जाऊ नये या योजनेमुळे तरुणांना उज्वल भविष्याची संधी मिळेल ह्यावेळी त्यांनी या योजनेची विस्तृत माहिती दिली. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading