fbpx
Monday, June 17, 2024
BusinessLatest News

युरो किड्स नवीन शैक्षणिक वर्षात लहान मुलांना ‘स्थिरस्थावर’ करण्यास करणार मदत

पुणे : भारतातील आघाडीचे प्री-स्कूल नेटवर्क असलेले युरो किड्स प्री-स्कूल जून २०२२ मध्ये नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करण्यासाठी सज्ज झाले असून देशभरातली सर्व १२०० हून अधिक केंद्रांवर लवकरच प्रत्यक्ष वर्गांमध्ये जाऊन शिकायला सुरुवात करणाऱ्या मुलांना  सुलभ व्हावे यासाठी २ आठवड्यांचा  सेटलिंग प्रोग्राम त्यांनी सुरू केला आहे. (सर्वप्रथम मूल याला प्राधान्य देणारी विचारसरणी)’चाइल्ड फर्स्ट आयडियोलॉजी’ साठी ओळखले जाणारे युरोकिड्स आपल्या प्रत्येक प्री-स्कूल केंद्रावर सुरक्षा आणि स्वच्छता यांचे सर्व नियम पाळून  मुलाला घरासारख्या वातावरणात अनेक आठवड्यांपर्यंत मजेशीर उपक्रमांच्या माध्यमातून सेटल (स्थिरस्थावर) करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे.

सेटलिंग प्रोग्राममध्ये लहान मुलांना गुंतवून ठेवण्यासाठी आणि प्री-स्कूलमध्ये दररोजच्या उपस्थितीला प्रोत्साहन देण्यासाठी विविध रोमांचक सत्रांचा समावेश आहे. यापैकी काही सत्रांमध्ये बाह्य उपक्रम, संगीत सत्रे, योग सत्रे आणि त्यांचे सामाजिक कौशल्य परत मिळवण्यासाठी त्यांच्या समवयस्क आणि शिक्षकांशी संवाद साधण्याच्या अनेक उपक्रमांचा समावेश असेल. एकदा ‘सेटलिंग प्रोग्राम’ संपल्यानंतर युरोकिड्सचे सुप्रशिक्षित शिक्षक विशेष नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम EUNOIA चा वापर गेल्या दोन वर्षांत महामारीमुळे निर्माण झालेली शिक्षणातील तफावत दूर करण्यासाठी करतील.

युरो किड्स प्री-स्कूलचा अभ्यासक्रम मुलांसाठी # अविरत शिक्षणाची खात्री देतो कारण भाषा, मोटर स्किल्स आणि संज्ञानात्मक कौशल्ये,  सामाजिक वर्तन आणि संवाद साधणे यासारखी महत्वाची कौशल्ये ०-५ वर्षे वयोगटात विकसित होत  असतात. युरोकिड्स प्री-स्कूलचे होमबडी अॅप आणि होम एंगेजमेंट कार्यक्रम मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी संरचित शिक्षण कार्यक्रम आणि उपक्रम सादर करतात. युरो किड्स प्री-स्कूलमधील प्रत्येक कार्यक्रम हा सर्वांगीण विकास सुनिश्चित करण्‍यासाठी मुलांना त्यांच्या वयानुसार योग्य ते शिक्षण देत तयार केले गेले असून शिक्षण आणि मौजमजेचा त्यात समतोल साधण्यात आला आहे. युरोज्युनियर आणि

युरोसिनियर स्तरावरील कार्यक्रमांमध्ये प्लेग्रुप, नर्सरी आणि बालवाडीतील मुलांचे खेळ जिज्ञासा वाढविणारे आणि या कोवळ्या मनांच्या सर्जनशील बाजूला चालना देण्यासाठी डिझाइन केलेले आहेत.

युरो किड्स प्री-स्कूलमधील EUNOIA हा दक्ष, जागरूक अभ्यासक्रम चाइल्ड फर्स्ट विचारसरणीतून घेतला गेला आहे. यामध्ये मुलांचे निष्पाप आणि सुंदर मन हे प्रगतीसाठी प्रेरणा आहे. EUNOIA या हसत खेळत सजग अभ्यासक्रमातून मन, शरीर आणि आत्मा यांच्यावर परिणाम करणाऱ्या मजेदार उपक्रम आणि खेळांचे मिश्रण सादर करण्यात येते. त्यामुळे मुलांसाठी आवश्यक जीवन कौशल्ये शिकणे, वाढणे आणि आत्मसात करणे यासाठी एक मजबूत पाया तयार होतो. अभ्यासक्रमामध्ये 3 डोमेन्स आहेत जी पुढे युरोफिट, युफोनिक्स, मॅथलॅब, सायंटिफिक स्पार्क, योगाकिड्स, युरोम्युझिक आणि माइंडफुल + यासारख्या विविध कार्यक्रमांमध्ये विभागली गेली आहेत. विशेष आशय वितरण भागीदारांच्या सहयोगाने हे कार्यक्रम आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading