fbpx
Monday, June 17, 2024
Latest NewsPUNE

पुरात आईला गमावलेल्या अनन्या सुदामेचे दहावीच्या परीक्षेत यश; मंजूषा नागपुरे यांनी केले कौतुक

पुणे : दहावीचा निकाल जाहीर झाला आणि कोरोना काळात ही अथक परिश्रम करत अनेक विद्यार्थी यशस्वी झाले , काही विद्यार्थ्यांच्या यशोगाथा तर अतिशय प्रेरक आणि स्फूर्तिदायक आहेत , अशीच अनन्या_सुदामे , अनन्या ची आई स्व. अमृता सुदामे या दोन वर्षांपूर्वी पावसाळ्यात आपल्या भागात वडगाव पुलानजिकच्या अचानक आलेल्या पुरात वाहून गेल्या त्यामुळे अनन्या चे आई चे छत्र हरवले, पुरात आईला गमावलेल्या अनन्या सुदामे हिने  दहावीच्या परीक्षेत  यश संपादन केले, तिचे माजी नगरसेविका मंजूषा दीपक नागपुरे यांनी केले कौतुक आहे. 

यावेळी बोलताना मंजूषा नागपुरे म्हणाल्या, ज्या काळात आपल्या मुलांसाठी आपली आईच सर्वस्व असते त्याच काळात अनन्या एकटी पडली पण न डगमगता जिद्दीने परिस्थिती वर मात करून आणि अभ्यास सहजरित्या सांभाळून अनन्या हिने दहावीत घवघवीत यश संपादन करत ९४ टक्के मिळवले .अनन्या सह तिच्या यशाच्या प्रवासात तिच्या पाठीशी उभ्या राहणाऱ्या आणि स्वतःच्या मुलांप्रमाणे अनन्या ची आई होणाऱ्या अनन्या ची मावशी ईशा वाईकर यांचेही कौतुक करावे तितके थोडे , अनन्या ची आई गेल्यानंतर त्यांनी अनन्या आणि तिच्या लहान बहिणीला आपल्यासोबत ठेऊन घेत स्वतः च्या मुलींसोबत सांभाळ केला , मी आज कु. अनन्या ची भेट घेत तिच्यासह यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
प्रभागातील  ज्ञानदा कवाणे हिने ही ९१ टक्के गुण मिळवत घवघवीत यश संपादन केले त्यानिमित्ताने तिचे आणि इतर विद्यार्थ्याचेही कौतुक आणि पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा । सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन ।

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading