Wednesday, June 3, 2026
Latest NewsPUNE

अजित पवार यांना भाषणात डावलण्यात आल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे आंदोलन

पुणे : देहु येथील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोदींनी भाषण करु न दिल्यामुळे राष्ट्रवादी आक्रमक झाली असून. राष्ट्रवादीमधील मंत्र्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. काल नागपूर, नाशिक ,अहदनगर ,औरंगाबाद या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन केले. आज पुण्यात राष्ट्रवादी युवक कॉग्रेसच्या वतीने संत तुकाराम महाराज चौकात निषेध आंदोलन करण्यात आले.

राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष किशोर कांबळे यांच्या नेतृत्वाखाली झाले आंदोलन.
या आंदोलनाला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते प्रदीप देशमुख, रोहन पायगुडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रदीप देशमुख म्हणाले,काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत देहू मध्ये झालेल्या कार्यक्रमात
उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांना भाषणाची संधी दिली नाही.
अजित पवार पुण्याचे पालक मंत्री असून सुद्धा अजित दादांना भाषणाची संधी दिली नाही. हा अजित दादांचा झालेला अपमान आहे.अजितदादांचा अपमान म्हणजे महाराष्ट्राचा अपमान अजित पवारांना भाषण याची संधी ही द्यायला पाहिजे होती.ती काही दिली नाही.भाजपने
केलेले पडयंत आहे. भाजपने अजित पवार यांची माफी मागावी अशी आम्ही मागणी या आंदोलनातून करत होतो. असे प्रदीप देशमुख म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading