fbpx
Thursday, May 16, 2024
Latest NewsPUNE

युसुफ फाउंडेशनच्या वतीने पर्यावरण दिनानिमित्त विविध उपक्रम

पुणे – युसुफ फाउंडेशनच्या वतीने “वर्ल्ड एनवोर्मेन्ट डे- ओन्ली वन अर्थ” या कार्यक्रमांतर्गत विविध विधायक उपक्रमांचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमा अंतर्गत गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी कपडे व अल्पोपहार वाटप, वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, चित्रकला स्पर्धा तसेच पुस्तकांचे वाटप असे विविध उपक्रम राबविण्यात आले. युसुफ फाउंडेशन व शिक्षण महर्षी डॉ. पी. ए. इनामदार यांच्या एच. जी.एम. आजम कॉलेज ऑफ एज्युकेशनच्या विद्यार्थ्यांनी “स्वयंसेवक” म्हणून या विधायक उपक्रमात सहभाग घेतला. संस्थेचे अध्यक्ष जावेद शेख, उपाध्यक्ष कुमार कार्तिक, संचालक समीना शेख, अश्विनी गावडे, साहिल शेख, अमान शेख, अलीम शेख यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सक्रिय सहभाग घेतला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading