fbpx
Monday, June 17, 2024
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

मोदींच्या दौऱ्यात ‘त्या’ फोटोची चर्चा

पुणे : देहू येथील नियोजित कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विमानाने लोहगाव विमानतळावर आले असता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी त्यांच्यात झालेल्या भेटीचा फोटो व्हायरल झाला असून यामुळे अनेकांना पहाटेच्या शपटविधीची आठवण झाली आहे. तसेच पुन्हा एकदा चर्चा रंगू लागल्या आहेत.

देहू येथील शिळा मंदिराच्या लोकार्पणांसाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुणे दौऱ्यावर होते. या नियोजित कार्यक्रमासाठी पंतप्रधानांचे आज दुपारी वायुसेनेच्या विमानाने लोहगाव विमानतळावर आगमन झाले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधानांचे स्वागत केले. त्यांच्या सोबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, खासदार गिरीश बापट, आमदार माधुरी मिसाळ, आमदार सर्वश्री सिद्धार्थ शिरोळे, सुनील कांबळे, चंद्रकांत पाटील, लेफ्टनंट जनरल जे.एस.नैन, पोलिस महासंचालक रजनीश सेठ, विभागीय आयुक्त सौरभ राव, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, वायुसेनेच्या पुणे विभागाचे प्रमुख एच. असुदानी आदी उपस्थित होते.

मात्र, पंतप्रधानांचे सर्वात आधी लक्ष गेले ते अजित पवार यांच्याकडे. यावेळी पंतप्रधानांनी अजित पवार यांच्या खांद्यावर हात ठेवत स्मित हास्याने संवाद साधला. अन् हाच फोटो दुपारपासून व्हायरल झाला  आहे. दरम्यान, अनेक अपक्ष व भाजपच्या नेत्यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना भाजप सोबत येण्याची मागणी केली आहे. या फोटोमुळे त्या चर्चांना पुन्हा एकदा सुरूवात झाली आहे.

 

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading