fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsMAHARASHTRA

मुंबईतील मध्य रेल्वेच्या कोच यार्डमध्ये अवतरणार मियावाकी जंगल

मुंबई :-  जागतिक पर्यावरण दिनानिमित्त केडीएम कंपनीने  मध्य रेल्वेच्या रेल्वे कोच यार्ड येथे मियावाकी वनीकरण प्रकल्पाचे अनावरण केले. या प्रकल्पाला सामाजिक उपक्रम गो शुन्या,इस्कॉन गोवर्धन इको व्हिलेज, एनएसएस कॅडेट्सचे सहाय्य लाभले आहे. जगप्रसिद्द मियावाकी वनीकरण हे  मॉडेल जपानी वनस्पतिशास्त्रज्ञ अकिरा मियावाकी यांच्या नावाने ओळखले जाते. या वनीकरणात फक्त देशी वृक्ष प्रजातींचा वापर करून जमिनीच्या छोट्याशा भागावर घनदाट मिनी-जंगल उभारले जाते.

केडीएमचे संस्थापक श्रीयुत एन डी माळी, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक  श्रीयुत अनिल कुमार लाहोटी, गो शुन्यचे सीईओ श्रीयुत गोपाल रायथाथा आणि रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

 भारतात  कमी होत जाणाऱ्या वनराईला उपाय म्हणून केडीएमने वृक्षजेन या उपक्रमानुसार  मियावाकी मॉडेलवर आधारित  ७५ सूक्ष्म जंगले वाढवून भारतीय स्वातंत्र्याची ७५ वर्षे साजरी करण्याचे ठरवेल आहे.    मियावाकी या स्वयं-शाश्वत सूक्ष्म वनांच्या  अनोख्या संकल्पनेचा उद्दिष्ट हे वनीकरणाची तूट भरून काढणे हे आहे. तसेच शहरी, निमशहरी, लहान शहरांमध्ये ऑक्सिजनची पातळी वाढवण्याचा  हा उद्देश या प्रकल्पाचा  आहे. ‘वृक्षजेन’ हे नाव वृक्ष व ऑक्सिजन या दोन शब्दांचे संयोजन आहे.ज्याप्रमाणे ऑक्सिजनशिवाय माणूस जगू शकत नाही, त्याचप्रमाणे झाडांशिवाय निसर्गाचे रक्षण करताच येणार नाही.

एन डी माली, केडीएमचे संस्थापक,या वेळी म्हणाले की, माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या प्रेरणेने  व गोवर्धन इको व्हिलेज, एनएसएस कॅडेट्स यांच्या संयुक्त विद्यमाने, आम्ही देशातील वनक्षेत्र पुनर्संचयित करण्याचा हा उदात्त उपक्रम हाती घेतला आहे. आता निसर्ग संगोपनासाठी पाऊल उचलण्याची  वेळ आली आहे.  पर्यावरण संरक्षण हा आमच्या उपक्रमाचा एक महत्त्वाचा पैलू आहे.  आपण  सर्व हवामान बदलाचे साक्षीदार आहोत व जंगलतोड हे या मागील प्रमुख कारण आहे. हवामान बदल यावर उपाय म्हूणन   ऑक्सिजनसाठी आपण अधिकाधिक झाडे लावून हातभर लावू शकतो. आपल्या येणाऱ्या  भावी पिढ्यांसाठी घनदाट व स्वयंपूर्ण सूक्ष्म वन निर्माण करण्यासाठी जे एक पाऊल आम्ही पुढे टाकले आहे याचा आम्हाला अभिमान वाटतो.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading