राज्यसभेच्या निकालानंतर पुण्यात भाजपाचा जल्लोष
पुणे: राज्यसभेच्या निवडणूकीचा निकाल लागला या राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या
3 जागा निवडून आल्या. त्यामुळे भाजपने राज्यभर जल्लोष करायला सुरुवात केली आहे आज पुण्यात पण कसबा गणपती समोर भाजपने जल्लोष केला. या जल्लोषाचे नेतृत्व भाजपाचे पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केले.
या जल्लोषाच्या वेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पेढे वाटून व नाचून जल्लोष साजरा केला. या जल्लोषाच्या वेळी भाजपचे धनंजय जाधव, राजेश येनपुरे, भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी, भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते हो महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
जगदीश मुळीक म्हणाले, राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी मधील मंत्री सारखे म्हणून दाखवत होते की आमच्या सगळ्या
जागा लागतील .पण पण महाविकासआघाडी मधल्या व अपक्ष आमदारांनी आम्हाला मतदान केले व आमच्या 3 जागा निवडून आल्या. चंद्रकांत पाटील व देवेंद्र फडणवीस त्यांच्या प्रयत्नांमुळे भारतीय जनता पार्टीचे 3 सीटा निवडून आल्या. म्हणून आज आम्ही जल्लोष करत आहोत येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत परत भाजपची सत्ता येईल .असे जगदीश मुळीक म्हणाले.
