‘जुगाड जनता’ मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
पुरुषोत्तम फिल्म इन्स्टिटयूटच्या पहिल्या वहिल्या मराठी चित्रपटाचे आज वाई येथे चित्रीकरण पूर्ण झाले असून मराठी मध्ये दादा कोंडके यांच्या नंतर हा पहिलाच ग्रामीण आणि विनोदी बाज असलेला चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.पश्चिम महाराष्ट्रातील नामवंत कलाकार या चित्रपटात दिसणार असून तरुणाईतील असणाऱ्या जुगाडू प्रवृत्तीवर चित्रपट भाष्य करणार असल्याचे दिग्दर्शक प्रशांत आर पाटील यांनी माहिती दिली .यावेळी निर्मात्या हेमा तुपे उपस्थित होत्या.
पत्रकार परिषदेला उपस्थित शिवसेना नेते सुरेश भोर म्हणाले की, माणसाच्या व्यस्त आयुष्यात थोडी तरी मनोरंजनाची आवश्यकता असते.दादा कोंडके पासून सुरु झालेली हास्याची मेजवानी कुठेतरी बंद होते की काय असे वाटत असताना जुगाड जनता सारखे विनोदी चित्रपट आपल्या इथे निर्माण होत आहेत ही आनंददायी बाब आहे. पाटील यांच्या पुरुषोत्तम फिल्म इन्स्टिटयूट च्या उदघाटन प्रसंगी त्यांनी उपस्थित मान्यवरांना शब्द दिला होता तो त्यांनी पाळला. लवकरच त्यांच्या इन्स्टिटयूटचा दुसरा चित्रपटही येईल. कलाकार आणि तंत्रज्ञ यांचेही त्यांनी अभिनंदन केले.
जुगाडा शिवाय कोणतीच गोष्ट शक्य नाही. जीवनात सगळ्यांना जुगाड करावाच लागतो. तो प्रेमासाठी असेल, मैत्रीसाठी असेल,नात्यांसाठी असेल प्रत्येक माणसाला ही गोष्ट करावीच लागते. त्याशिवाय आपलं जगणं शक्य नाही.चित्रपट फक्त जुगडावरचं भाष्य करत नाही तर त्यापुढे जाऊन युवा पिढीत आशा निर्माण करेल. चित्रपटातील गाव सुद्धा एक पात्र म्हणून काम करताना दिसेल.असे लेखक कल्पेश जगताप यांनी सांगितले.
चित्रपटाची कथा आणि पटकथा कल्पेश जगताप यांची असून, संवाद ऋषिकेश पवार आणि कल्पेश जगताप यांचे आहेत.चित्रपटाच्या मध्यवर्ती भूमिकेत रोहित चव्हाण आणि लक्ष्मी विभुते दिसणार आहेत. निर्मात्या हेमा तुपे आणि एकनाथ गिते यांची केमेस्ट्रीही प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. राहुल मगदुम आणि गायत्री बनसोडे यांचेसह, शिवानी घाडगे, श्रद्धा पवार,नंदा दानवले,महेश जाधव,प्रणव थोरवडे,रोहित भोसले,अक्षय धमाल,ओंकार भोसले,राजू जगताप,अल्पेश चव्हाण,पृथ्वीराज लांडगे,संतोष पाटील हे कलाकार भूमिकेत आहेत.चित्रपटात तीन गाणी असणार आहेत.चित्रपटाचे चित्रीकरण वाई येथे झाले आहे.दिग्दर्शक प्रशांत पाटील यांच्या पुरुषोत्तम फिल्म इन्स्टिटयूट निर्मित चित्रपटाचे चित्रीकरण कौशल गोस्वामी यांनी केले आहे.तर प्रकाश योजना धनाजी यमकर यांनी केली आहे.चित्रपटाचे सह दिग्दर्शन अजय वाघमारे,प्रीतम रणबागले,आलोक गायकवाड यांनी पहिले आहे.
यावेळी, शिवसेना नेते सुरेश भोर, श्रीकांत भुरुक, विनोद दानवले, धनाजी यमकर, समीर तुपे, सौरभ भिसे यांचेसह चित्रपटातील कलाकार आणि तंत्रज्ञ उपस्थित होते.
