Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

राष्ट्रवादी कॉंग्रेस चा वर्धापन दिन उत्साहात साजरा

पुणे:राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 23 वा वर्धापन दिन उत्साहात व जोशपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथे माजी आमदार जगन्नाथ शेवाळे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करुन कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली सदर प्रसंगी बोलताना शेवाळे म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासूनच तरुण नेतृत्वाला वाव देण्याचे काम आदरणीय पवार साहेबांनी वेळोवेळी केलेले आहे पक्षाच्या मंत्रिपदापासून ते सर्वच पदांवर जास्त तरुण नेतृत्वाला संधी देण्याचा प्रयत्न पक्षाने सातत्याने केला आहे , पक्षसंघटन बळकट करून प्रत्येकाने पक्ष सर्वच ठिकानी कायमच अग्रस्थानी कसा राहील याकरीता प्रयत्नशील राहीले पाहीजे
सदर प्रसंगी शहराध्यक्ष प्रशांत जगताप , खा वंदना चव्हाण , जयदेव गायकवाड भगवानराव साळुंखे , अंकुश काकडे , दीपाली धुमा़ळ , प्रदीप देशमुख रवींद्र माळवदकर , योगेश जगताप तसेच अनेक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते . मोठ्या संख्येने उपस्थीत होते

राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी हा महात्मा गांधीच्या विचारसरणीवर चालणारा पक्ष आहे सद्य राजकीय परिस्थितीमुळे वातावरण अत्यंत गढूळ होत आहे.  पक्षाचा तेवीस वर्षांचा नेत्रदीपक प्रवास त्याचबरोबर महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या बाहेर पक्षाची वाढ आज मोठ्या प्रमानात झाली आहे 23 व्या वर्धापन दिनाचे निमित्त साधून शहरातील सर्व राजकीय पक्षांचे अध्यक्ष तथा पदाधिकारी विविघ वर्तमानपत्रातील पत्रकार मंडळी विविध क्षेत्रातील मान्यवर प्रशासनातील अधिकारी कर्मचारी आणि पक्षांचे पदाधिकाऱी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हजारोंच्या संख्येने सायंकाळी झालेल्या स्नेहमेळाव्यात उपस्थीत होते यामुळे निश्चित येणाऱ्या काळात पुणे शहर हे राजकिय संस्कृती कशी वेगळी जोपासते हे अधोरेखित करणारे ठरणार आहे. 


मरणोत्तर नेत्रदान संकल्प 
मरणोत्तर नेत्रदान संकल्प कार्यक्रम ह्या पक्षाच्या नाविन्यपुर्ण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शहराध्यक्ष प्रशांत जगताप खा. वंदनाताई चव्हाण, माजी आमदार जगन्नाथ शेवाळे ,प्रदीप देशमुख यांनी स्वतःचे मरणोत्तर नेत्रदानाचे फॅार्म भरुन या उपक्रमाचा शुभारंभ केला. यावेळी उपस्थित ५०७ जणांनी फॅार्म भरुन मरणोत्तर नेत्रदान करण्याचा संकल्प केला. या उपक्रमाचे आयोजन पुणे शहर उपाध्यक्षा डॉ.सुनिता मोरे यांनी केले होते.  तसेच पक्षाच्या वतीने अखिल मंडई मंडळाच्या शारदा गणपतीची महाआरती करण्यात आली, प्रार्थना समाज , बुधवार पेठ येथे वृक्षारोपण तसेच पुणे शहराच्या विविध ठिकाणी अनेक सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading