राज्याची चिंता वाढली; दिवसभरात गेल्या दोन महिन्यातील सर्वाधिक कोरोना रुग्णवाढ
मुंबई : राज्यात गेल्या दोन दिवसापासून कोरोना रुग्ण संख्येचा आकडा वाढत आहे. आज तर गेल्या दोन महिन्यातील सर्वाधिक 2 हजार 701 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याची चिंता वाढली आहे. दिलासादायकबाब म्हणजे, राज्यात आज कोरोनाच्या शून्य मृत्यूची नोंद आहे.
आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात आज दिवसभरात 2 हजार 701 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1 हजार 327 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यातील चिंतेचीबाब अशी की यातील एकूण रुग्णांपैकी तब्बल 1 हजार 765 रुग्ण हे एकट्या मुंबईमध्ये आहेत. राज्यात आज एकूण 9806 सक्रिय रुग्ण असून मुंबईत सर्वाधिक म्हणजे 7000 इतक्या सक्रिय रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.
