Wednesday, June 3, 2026
Latest NewsPUNE

ज्येष्ठ साहित्यिक अर्जून डांगळे यांचा अमृतमहोत्सवानिमित्त 15 जून रोजी गौरव सोहळा

पुणे : ज्येष्ठ साहित्यिक ,विचारवंत ,विद्रोही कवी अर्जुन डांगळे यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त व त्यांच्या दलीत पँथर अधोरेखित सत्य या ग्रंथाच्या निमित्ताने पुण्यातील आंबेडकरी चळवळ व पुणेकर नागरिक यांच्या वतीने येत्या 15 जून रोजी माजी केंद्रीय मंत्री सुशीकुमार शिंदे यांच्या हस्ते व ज्येष्ठ कामगार नेते बाबा आढाव यांच्या उपस्थितीत अमृतमहोत्सवी गौरव सोहळा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे .
ज्येष्ठ साहित्यिक अर्जुन डांगळे हे दलीत पँथर चे एक संस्थापक सदस्य होते . या सोहळ्यास विधानपरिदेच्या उपाध्यक्षा डॉ. नीलमताई गोऱ्हे , ऍड.भीमराव आंबेडकर ,अविनाश महातेकर , माजी मंत्री रमेश बागवे ,ऍड.जयदेव गायकवाड, ऍड.भाई विवेक चव्हाण ,राष्ट्रवादी चे शहराध्याक्ष प्रशांत जगताप ,शिवसेनेचे प्रमुख संजय मोरे ,यासह विविध पक्ष संघटनेचे नेते आणि पदाधिकारी उपस्थित रहाणार आहेत .
या कार्यक्रमाचे व समितीचे मुख्य संयोजक शैलेद्र मोरे आहेत तर या सोहळ्याचे स्वागताध्यक्ष डॉ.अमोल देवळेकर आहेत .

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading