Wednesday, June 3, 2026
Latest NewsPUNE

छत्रपती राजाराम मंडळाच्यावतीने शिवराज्याभिषेकदिनी स्वराज्यगुढीचा दिमाखदार सोहळा संपन्न

पुणे : शिवराज्याभिषेक हा इतिहासातील लोकविलक्षण सोहळा आहे. हा सोहळा प्रत्येकाच्या मनामनामध्ये साजरा झाला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज अखंड हिंदुस्थानाचे उर्जास्थान आहेत. छत्रपती राजाराम मंडळाने आयोजित केलेला हा दिमाखदार शिवराज्यभिषेक सोहळा लोकांना शिवरायांचे विचार लोकांच्या मनामध्ये रुजविण्यासाठी महत्वपूर्ण आहेत. त्यांच्या या उपक्रमाचे स्वागत आहे. समाजप्रबोधानाचे पर्व असेच सुरु राहणे काळाची गरज असल्याचे मत दिग्दर्शक आणि अभिनेते प्रवीण विठ्ठल तरडे यांनी व्यक्त केले.

छत्रपती राजाराम मंडळाच्यावतीने भगव्या स्वराज्यध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारुन सार्वजनिक शिवस्वराज्य दिन म्हणजेच शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. सुप्रसिद्ध सिनेदिग्दर्शक आणि अभिनेते प्रवीण विठ्ठल तरडे यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला. यावेळी मंडळाचे अध्यक्ष युवराज निंबाळकर, विनोद सातव, उपाध्यक्ष अरुण गवळे, संग्राम शिंदे, सुनिल निंबाळकर, स्वप्निल खडके, विनायक रासकर, जितेंद्र भूरुक, प्रतिक झोरे, मेघराज निंबाळकर, प्रसन्न पाटील, महेश पोंक्षे, मनोज शेंडे, रमाकांत गायकवाड उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading