Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

पुणे मेट्रो लाईन ३ च्या गाड्यांमध्ये वाय-फाय सुविधा उपलब्ध करून द्यावी – एस. चोकलिंगम

पुणे : “पुणे हे देशविदेशातील विद्यार्थ्यांसाठी प्रमुख महत्वाचे शैक्षणिक केंद्र म्हणून आकाराला आलेले असल्याने येथील विद्यार्थ्यांना वेगवान, सुरक्षित, प्रदूषणमुक्त परिवहन मिळवून देणारी मेट्रो रेल्वे अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो लाईन ३ ही विद्यापीठाला देखील जोडणारी असल्याने तिचे आगळे महत्व आहे,” असे मत यशदाचे महासंचालक एस. चोकलिंगम यांनी व्यक्त केले. तसेच “प्रवासादरम्यान विद्यार्थ्यांना पुणे मेट्रो लाईन ३ च्या गाड्यांमध्ये वाय-फाय सुविधा उपलब्ध करून देण्याचा विचार करावा,” असे आवाहनही चोकलिंगम यांनी यावेळी केले.

जागतिक पर्यावरण दिना निमित्त हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गावरील पुणे मेट्रो लाईन ३च्या वतीने आज ताथवडे कास्टींग यार्ड येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून चोकलिंगम बोलत होते. यावेळी पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी आलोक कपूर तसेच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) आयुक्त डॉ. सुहास दिवसे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच  पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेडच्या संचालक नेहा पंडीत, प्रकल्प संचालक अक्षय शर्मा यांनी यावेळी उंबर, वड, पिंपळ, कांचन इत्यादी स्थानिक झाडांचे वृक्षारोपण केले. या नंतर मान्यवर पाहुण्यांच्या प्रकट मुलाखती घेण्यात आल्या.

‘आयएएस डॉ. दिवसे’ आणि बैलगाडीचा प्रवास

“आयएएस अधिकारी असल्यामुळे तुमच्या दिमतीला मोठमोठ्या आलिशान गाड्या असतील परंतु तुम्ही आजवर कधी बैलगाडीतून प्रवास केला आहे का?” या प्रश्नाला उत्तर देतानापीएमआरडीएचे आयुक्त डॉ. सुहास दिवसे म्हणाले, “मी जरी पदवीने आयएएस असलो, तरी मनाने आजही वांगी गावचा एक शेतकरीच आहे. मी बैलगाडीतून फक्त भरपूर प्रवासच केला नसून बैल खरेदीही केली आहे. आजही माझ्या घरी दिवसाची सुरुवात रोज शेती, बैल, बियाणे, पीक याच विषयावर चर्चा करून होत असते.”

‘महासंचालक चोकलिंगम’ आणि आवडते झाड

आज यशदा सारख्या संस्थेचे महासंचालक असणारे चोकलिंगम स्वतः विद्यार्थी असताना त्यांना सर्वाधिक जवळीक असणारे झाड कोणते होते? या प्रश्नाचे उत्तर देताना एस. चोकलिंगम म्हणाले, “माझ्या लहानपणी घरापाशी असणारे कडूनिंबाचे झाड माझे सर्वात लाडके होते. मी विद्यार्थी असताना त्यावर चढून जायचो, त्याच्या सावलीत वाचन करत बसायचो. आनंदाची बाब म्हणजे एवढ्या वर्षांनंतरही ते झाड आजही उभे आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading